आयसीसी क्रमवारीत जैस्वालची ‘यशस्वी’ मुसंडी

अवघ्या आठ कसोटी सामन्यानंतर टॉप १५ फलंदाजामध्ये स्थान

आयसीसी क्रमवारीत जैस्वालची ‘यशस्वी’ मुसंडी

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारताने आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे. या मालिकेतील सामन्यात भारतीय संघाच्या युवा खेळाडूंनी मोलाची कामगिरी केली आहे. याचेच फलित म्हणजे आयसीसी क्रमवारीत भारतीय युवा खेळाडूंनी मोठी मुसंडी मारली आहे. इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत दोन द्विशतकं ठोकणाऱ्या यशस्वी जैस्वालला आयसीसी क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे.

आयसीसी क्रमवारीमध्ये यशस्वी जैस्वाल याने अवघ्या आठ कसोटी सामन्यानंतर टॉप १५ फलंदाजामध्ये स्थान मिळवले आहे. आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी जारी केली आहे. यशस्वी जैस्वाल हा विराट कोहलीच्या जवळ पोहचला असून तो विराट कोहलीपासून केवळ दोन नंबर मागे म्हणजेच दूर आहे.

आयसीसी कसोटी क्रमवारीत यशस्वी जैस्वाल यानं १२ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विराट कोहली आयसीसी क्रमवारीत नवव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेचा विराट कोहली सध्या भाग नाही. यशस्वी जैस्वाल याच्या खात्यात ७२७ रेटिंग गुण आहेत. तर विराट कोहली याच्या खात्यात ७४४ रेटिंग गुण आहेत.

कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पहिल्या पाचात मात्र भारतीयांना अद्याप स्थान मिळालेले नाही. कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा केन विल्यमसन अव्वल स्थानावर आहे. विल्यमसनच्या नावावर ८९३ रेटिंग गुण आहेत. तर ८१८ रेटिंग गुणांसह ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा जो रुट ७९९ रेटिंग गुणांसह तिसऱ्या तर न्यूझीलंडचा डेरिल मिचेल ७८० रेटिंग गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा बाबर आझम ७६८ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, इंग्लंडविरोधात भारताने ३-१ कसोटी मालिकेत आघाडी घेतली आहे. यशस्वी जैस्वाल याने आपली चमकदार कामगिरी करत विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला आहे. चार कसोटी सामन्यात आठ डावांमध्ये यशस्वी जैस्वाल याने ९४ च्या सरासरीने ६५५ धावा ठोकल्या आहेत. यामध्ये दोन द्विशतकं आणि दोन अर्धशतकं ठोकली आहेत. यशस्वी जायस्वाल यानं आठ कसोटी सामन्यातच आघाडीच्या १५ खेळाडूंमध्ये स्थान पटकावलं आहे.

हे ही वाचा:

अवैध खाण प्रकरणी अखिलेश यादव यांना सीबीआयकडून समन्स!

देवेंद्र फडणवीसांच्या टीकास्त्रानंतर मनोज जरांगेंनी मागितली माफी

हिमाचलमध्ये काँग्रेस दुभंगली; मंत्र्यांचा राजीनामा आणि राज्यसभेत क्रॉस वोटिंग

पिसेतल्या आगीनंतर मुंबईत ५ मार्चपर्यंत १५ टक्के पाणीकपात!

यशस्वी जायस्वाल याने एकूण आठ कसोटी सामन्यात ७० च्या सरासरीने ९७१ धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतकांचा समावेश आहे. त्याशिवाय तीन अर्धशतकेही ठोकली आहेत.

Exit mobile version