इस्रायल आणि हमासमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद स्वीकारला जाऊ शकत नाही, असे ठाम प्रतिपादन केले. तसेच, पॅलिस्टिनींच्या मुद्द्यावर तोडगा आवश्यक आहे, असे मत मांडले. रोममधील संयुक्त सत्रात ते संबोधित करत होते.
‘७ ऑक्टोबरला जे झाले, ते दहशतवादाचे भयंकर कृत्य होते. संपूर्ण क्षेत्रात तणाव होता. मध्यपूर्वेसह संपूर्ण जगच युद्धामुळे चिंतेत आहे. त्यासाठी विविध मुद्द्यांवर समतोल साधण्याची आवश्यकता आहे. भारत सरकार द्विराष्ट्राच्या तोडग्याचा पुनरुच्चार करते. याबाबत समतोल साधण्याची आवश्यकता आहे. दहशतवाद कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाऊ शकत नाही. पॅलिस्टिनींच्या समस्या सोडवल्या पाहिजेत,’ असे जयशंकर यांनी सांगितले.
हे ही वाचा:
भारत- श्रीलंका सामन्यादरम्यान ११ विक्रम
‘मुली, मी तुला आशीर्वाद देतो, तुझे नाव लिही. मी तुला नक्की पत्र लिहीन’
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर मागे; सरकारला २ जानेवारीपर्यंत दिला वेळ
या समस्येवर चर्चेतूनच तोडगा काढला जाऊ शकतो, असे जयशंकर यांनी सुचवले. दहशतवाद हा कोणत्याही समस्येवर तोडगा असू शकत नाही. आम्ही चर्चेला समर्थन देतो. मानवतावादी कायद्यांचा आदर केला पाहिजे. भारत नेहमीच पॅलिस्टिनींच्या सोबत आहे. आम्ही नेहमीच त्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौमत्वाची पाठराखण केली आहे, असेही जयशंकर यांनी नमूद केले.
हल्ल्याची ही तीन कारणे
जेरूसलेममध्ये अल-अक्सा मशिदीला इस्रायलकडून अपवित्र केले जात असल्याचा हा बदला आहे, असे हमासकडून सांगितले जात आहे. हमासने सांगितले की, एप्रिल २०२३मध्ये इस्रायली पोलिसांनी अल-अक्सा मशिदीवर ग्रेनेड फेकून तिला अपवित्र केले होते. इस्रायली सैन्य सतत हमासच्या तळांवर हल्ले करून अतिक्रमण करते आहे. इस्रायली सैन्य आमच्या महिलांवर हल्ले करते आहे, असेही हमासने जाहीर केले. हमासने सर्व अरब देशांना इस्रायलशी संबंध तोडून टाकण्याचे आवाहन केले आहे. इस्रायल एक चांगला शेजारी आणि शांत देश कधी होऊ शकत नाही, असा दावा हमासने केला आहे.