‘पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग; मात्र लोकांना ते विसरायला लावले’

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा आरोप

‘पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग; मात्र लोकांना ते विसरायला लावले’

‘पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे. तो कधीही भारताबाहेर गेलेलाच नाही. मात्र याबद्दल लोकांना विसरायला लावले गेले,’ असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ओडिशातील कटक येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान स्पष्ट केले. त्यांना पाकव्याप्त काश्मीरबाबत भारताच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.‘पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे. तो कधीही देशाबाहेर गेलेलाच नाही. तसा भारतीय संसदेचा ठराव असून पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच एक भाग आहे,’ याचा जयशंकर यांनी पुनरुच्चार केला.

‘स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळात भारताने पाकिस्तानला हा प्रदेश रिकामा करण्यास सांगितले नाही. त्यामुळे विपरित परिस्थिती सुरूच राहिली. जेव्हा तुमच्याकडे जबाबदार असा कोणी संरक्षक नसतो, तेव्हा बाहेरचा कोणी तरी चोरी करतो,’असेही ते म्हणाले. भारतीयांना पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्याबाबत विसरायला लावले गेले, मात्र लोकांना पुन्हा त्यांची आठवण करून दिली गेली आहे, असेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

इस्रायलने बंद केले अल जजीराचे कार्यालय!

‘भाजपला मदत करण्यासाठी हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला’

लखनऊवर विजय मिळवून कोलकाता अव्वल स्थानी!

झारखंडमध्ये मंत्र्याच्या पीएच्या नोकराच्या घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड

विशेष म्हणजे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही रविवारी ‘भारताला पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची गरज नाही कारण तेथील लोक स्वतःहून भारताचा भाग बनू इच्छितात,’ असे वक्तव्य केले होते.‘मला वाटते की भारताला काहीही करावे लागणार नाही. जम्मू-काश्मीरमध्ये ज्या प्रकारे परिस्थिती बदलली आहे, ज्या प्रकारे या प्रदेशात आर्थिक प्रगती होत आहे आणि शांतता परत आली आहे. मला वाटते की, पाकव्याप्त काश्मीरमधील रहिवासीच भारतात विलीन व्हावे, अशी मागणी करतील,’ असे सिंह म्हणाले होते. ‘पाकव्याप्त काश्मीर आमचा होता, आहे आणि राहील,’ असे त्यांनी स्पष्ट केले होते.

जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० फार पूर्वीच रद्द व्हायला हवे होते, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले. ही एक समस्या होती, कारण जोपर्यंत कलम ३७० लागू होते, तोपर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये अलिप्ततावादाची, अतिरेकीपणाची भावना निर्माण झाली होती,’ असे जयशंकर यांनी नमूद केले.कलम ३७० ही घटनेतील तात्पुरती तरतूद होती आणि ती काढून टाकणे गरजेचे होते. काही लोकांच्या निहित स्वार्थासाठीच जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० कायम होते, असा दावा जयशंकर यांनी केला.

Exit mobile version