भारतचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांची भेट घेऊन त्यांना भेट म्हणून गणेशाची मूर्ती आणि क्रिकेटर विराट कोहलीने ऑटोग्राफ केलेली क्रिकेट बॅट दिली.ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नीकडून करण्यात आलेल्या स्वागताबद्दल एस जयशंकर यांनी आभारही मानले.
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर सध्या युनायटेड किंगडमच्या पाच दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. ११ नोव्हेंबर रोजी ते ब्रिटनमध्ये पोहोचले आणि १५ नोव्हेंबरपर्यंत तेथे असतील. त्यांच्या भेटीदरम्यान त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांची १० डाउनिंग स्ट्रीट येथे भेट घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.इतकंच नाही तर मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर आणि त्यांची पत्नी क्योको जयशंकर यांनी ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती याना भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची स्वाक्षरी असलेली बॅट आणि एक गणेशाची मूर्ती भेट म्हणून दिली.
हे ही वाचा..
दागिन्यांच्या जाहिरातींसाठी नवीन सेलिब्रिटी मिळवण्यात कंपन्यांच्या नाकी नऊ!
राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या स्थानकाचाही कायापालट
उत्तराखंडमध्ये निर्माणाआधीच बोगदा कोसळला, ३६ जण अडकल्याची भीती!
भारतात पाचपैकी चार अवयवदात्या महिला!
Delighted to call on Prime Minister @RishiSunak on #Diwali Day. Conveyed the best wishes of PM @narendramodi.
India and UK are actively engaged in reframing the relationship for contemporary times.
Thank Mr. and Mrs. Sunak for their warm reception and gracious hospitality. pic.twitter.com/p37OLqC40N
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) November 12, 2023
जयशंकर यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.जयशंकर यांनी ट्विट केले की, “पंतप्रधान ऋषी सुनक यांना दिवाळीच्या दिवशी भेटून आनंद झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा दिल्या. समकालीन काळासाठी भारत आणि ब्रिटन संबंध सुधारण्यात सक्रियपणे व्यस्त आहेत. मिस्टर आणि मिसेस सुनक यांचे हार्दिक स्वागत आणि त्यांनी केलेल्या आमच्या आदरातिथ्याबद्दल धन्यवाद, असे ट्विट करत त्यांनी पीएम सुनक यांच्यासोबतच्या भेटीचे काही फोटोही शेअर केले आहेत.