भाजपा आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा अपघात झाला त्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या अपघाताच्या बातमीनंतर अनेक जण त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत आहेत. जयकुमार गोरे यांचे वडील भगवान गोरे यांनी भेट घेत आपल्या मुलाची भेट घेत संवाद साधला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलतांना काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या वडिलांनी दिली आहे. भगवान गोरे म्हणाले की, अपघात झाला त्यावेळी पुलावर वाहतूक नव्हती. अपघाताच्या ठिकाणी मी गेलो होता, तिथे अपघात होण्यासारखं काही दिसले नाही. पुलाचा कठडा तोडून गाडी गेली कशी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मात्र, फलटणमध्येचं हे घडतंय म्हणून मला शंका आहे. विशेष म्हणजे फलटणमध्येचं हे घडतंय म्हणून मला शंका आहे. पण व्यक्तिशः माझा कुणावरही संशय नाही, असंही भगवान गोरे म्हणाले आहेत.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी जयकुमार गोरे यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, जयकुमार यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोणताही धोका नाही. गोरे माझ्यासोबत बोलले आमच्यात चर्चा देखील झाली पाच सहा दिवसांनंतर ते आयसीयूमधून बाहेर येतील अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली.
हे ही वाचा :
नीरज चोप्राचे हे विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?
माजी सैनिकांचे टेन्शन दूर, आता मिळणार पेन्शन
५४ वर्षांपूर्वी याच दिवशी मानव प्रथमच चंद्राच्या कक्षेत
दरम्यान, पुणे-पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण येथील स्मशानभूमीजवळ हा अपघात पहाटे ३.३० वाजता झाला. गोरे हे आमदार पुण्याहून दहिवडी या त्यांच्या गावी जात होते. जयकुमार गोरे यांची फॉर्च्युनर एसयूव्ही पुलावरून थेट तीस फूट खाली दरीत कोसळली.