एका ७५ वर्षीय सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार राजस्थानच्या जयपूरमध्ये घडला आहे. सेवानिवृत्त अधिकाऱ्याने १० रुपये अतिरिक्त भाडे देण्यास नकार दिल्याने बस कंडक्टरकडून मारहाण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ही घटना शुक्रवारी (१० जानेवारी) घडल्याचे सांगण्यात येत असून, त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
कनोटा पोलिस स्टेशनचे गृह अधिकारी (एसएचओ) उदय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त अधिकारी आरएल मीना हे आग्रा रोडवरील कनोटा बस स्टँडवर उतरणार होते. मात्र, कंडक्टरने त्यांना त्यांच्या स्टॉपवर येण्याची माहिती दिली नाही. यानंतर बस पुढील स्टॉप नाईला या ठिकाणी पोहोचली. बस पुढच्या स्टॉपवर पोहोचल्याचे कळताच सेवानिवृत्त अधिकारी बसमधून उतरण्यास पुढे सरसावले. यावेळी बस कंडक्टर घनश्याम याने त्यांच्याकडे १० रुपये जादा भाडे मागितले.
हे ही वाचा :
सोनमर्ग- लडाखला जोडणाऱ्या बोगद्याचे पंतप्रधानांनी केले उदघाटन!
आगीच्या तांडवातून वाचलेल्या पाळीव कुत्र्याला घेऊन तो नाचला!
ग्रूमिंग गँग फाईल्स: ब्रिटनमधील अत्याचार, हत्या, बलात्काराचे भयंकर वास्तव!
निवडणूक लढवण्यासाठी मुख्यमंत्री आतीशी यांच्या पदरात १८ लाख जमा!
यावर सेवानिवृत्त अधिकाऱ्याने बस कनोटा येथे उतरवले नसल्याचे कारण देत पैसे देण्यास नकार दिला. या मुद्द्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. कंडक्टरने अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्यानंतर त्यांनी कंडक्टरला चापट मारली. यानंतर कंडक्टरने त्याच्यावर हल्ला केला.
या घटनेच्या व्हायरल व्हिडीओमध्ये कंडक्टर निवृत्त अधिकाऱ्याला सतत मारहाण करत असल्याचे दिसत आहे, तर अनेक प्रवासी हा सर्व प्रकार बघतच बसल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर निवृत्त अधिकाऱ्याने शनिवारी (११ जानेवारी) कंडक्टरविरोधात कनोटा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर कंडक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
#Jaipur : किराए से 10 रुपया ज्यादा मांग रहा था बस कंडक्टर, नहीं देने पर रिटायर्ड IAS अधिकारी को लात घूंसे से पीटा
जयपुर में लो-फ्लोर बस में रिटायर्ड बुजुर्ग IAS अधिकारी को पीटने का वीडियो वायरल होने पर कानोता थाने में मुकदमा दर्ज किया गया है. दस रुपये किराए को लेकर विवाद बढ़ने… pic.twitter.com/1mYS1MAR5a
— AajTak (@aajtak) January 12, 2025