जयपूर, नागपूर, गोवा विमानतळांना सोमवारी(२९ एप्रिल) बॉम्बच्या धमकीचे ईमेल आले आहेत.त्यामुळे खबरदारी म्हणून सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली आहे.पोलिसांना हा फसवा ईमेल असल्याचा संशय आहे.तसेच ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
दक्षिण गोव्यातील दाबोलिम विमानतळावर बॉम्ब असल्याच्या ईमेलने सोमवारी अधिकाऱ्यांना गोंधळात टाकले.त्यानंतर परिसराची सुरक्षा वाढवण्यास सांगितले, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. विमानतळ संचालक एसव्हीटी धनमजया राव यांनी सांगितले की, सकाळी धमकीचा मेल आला.याबाबत आम्ही पोलिसांना माहिती दिली.पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकाने संपूर्ण परिसराचा शोध घेतला.आम्ही आता अतिरिक्त खबरदारी घेत आहोत. विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली असली तरी उड्डाण संचालनावर परिणाम होणार नाही, असे एसव्हीटी धनमजया राव यांनी सांगितले.
हे ही वाचा..
मानखुर्दमध्ये लव्ह जिहाद: निजामने हिंदू तरुणीची केली हत्या, शरीराचे तुकडे करून भरले बॅगेत!
हुथी दहशतवाद्यांचा तेलवाहू जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला!
‘काँग्रेसचा इतिहास कलंकित मात्र तरीही पाहतात सत्तेचे स्वप्न’
हाँगकाँग, सिंगापूरनंतर एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवकडून बंदी
असाच धमकीचा मेसेज महाराष्ट्रातील नागपूर विमानतळाला मिळाला.त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळ परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या माध्यमातून विमानतळावर तपासणी देखील करण्यात आली आहे.अद्याप कोणतीही हालचाल दिसून आलेली नाही.दरम्यान, अशाच पद्धतीचे धमकीचे मेल देशभरातील अनेक विमानतळांवर आल्याची ही माहिती समोर आली आहे.