जयपूरच्या विश्वकर्मा येथे एका आगीची घटना घडली आहे.विश्वकर्मा येथील एका घराला लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.विश्वकर्मा येथील जैसल्या या गावात ही घटना घडली.
आग एवढी भीषण होती की, अपघातात संपूर्ण कुटुंब जिवंत जळून खाक झाले. आगीचे कारण अध्याप समोर आलेले नाही.दुर्घटनेत मृत्यू पावलेले सर्वजण बिहारचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या मधुबनी येथील एक पाच सदस्यीय कुटुंब जैसल्या गावात भाड्याने राहत होते.घरातील सर्व सदस्य झोपले असताना रात्री घराला आग लागली.आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने घरातील सर्व सदस्यांना बाहेर पडता आले नाही.आगीपासून बचावासाठी सर्व कुटुंब घरातील एका कोपऱ्यात गेले अन त्याठिकाणीच त्यांचा होरपळून मृत्यू झाला.
हे ही वाचा:
चॅट जीपीटी म्हणतं, यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई आणि मुंबईचा संघ चमकणार
केंद्राने रोहिंग्यांना राहण्याचा अधिकार नाकारला
केजरीवाल यांना वाटू लागली अटकेची भीती!
ब्रेन चीप यंत्राचा वापर करून अर्धांगवायू झालेल्या रुग्णाने बुद्धिबळ खळले
शेजाऱ्यांकडून माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.मात्र, तो पर्यंत संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला होता.अग्निशमन दलाच्या पथकाने जळालेले मृतकुटुंब बाहेर काढले.पोस्टमॉर्टमसाठी सर्व मृतदेह नजीकच्या एसएमएस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.दरम्यान, आगीचे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले की, आगीच्या दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्यांच्या आत्म्यास शांती लाभो.