बांगलादेश: तुरुंगात बंद असलेल्या श्री चिन्मय कृष्ण दास प्रभू यांचे आमरण उपोषण सुरू!

इस्कॉन कोलकाता उपाध्यक्ष राधारमण दास यांनी दिली माहिती

बांगलादेश: तुरुंगात बंद असलेल्या श्री चिन्मय कृष्ण दास प्रभू यांचे आमरण उपोषण सुरू!

बांगलादेशात तुरुंगात असलेले इस्कॉनचे पुजारी चिन्मय कृष्णा प्रभू यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. इस्कॉन कोलकाता उपाध्यक्ष राधारमण दास यांनी या संदर्भात एक निवेदन जारी करत माहिती दिली. जगभरातील देशांनी चिन्मय प्रभू यांच्यावर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष दिले पाहिजे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, चिन्मय कृष्णा प्रभू यांनी तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले आहे. तुलसी गॅबार्ड आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच एकमेव आशा आहे. जगाने जागे व्हावे आणि एका भिक्षूवरील या गंभीर अन्याय आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरुद्ध आवाज उठवावा.

हे ही वाचा : 

मृत्यू झालेली महिला १८ महिन्यानंतर परतली गावी, कुटुंबाने केले होते अंतिम संस्कार!

नागपूर हिंसाचार: डेमोक्रॅटिक पार्टीच्या हमीद इंजिनियरसह युट्यूबर मोहम्मद शहजाद खानला अटक

उत्तर प्रदेशमध्ये सामुहिक बलात्कार, हत्या प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार

नागपूर हिंसाचार: ६२ वाहनांसह एका घराचे नुकसान, सरकारकडून भरपाई जाहीर!

दरम्यान, बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. चिन्मय कृष्ण दास यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक झाली होती. वृत्तानुसार, चिन्मय कृष्णा दास यांची प्रकृती बिघडत चालली आहे, कारण त्यांना तुरुंगात मूलभूत गोष्टींपासून वंचित ठेवले जात आहे. चिन्मय कृष्ण दास यांना तुरुंगात जाऊन आता पाच महिने पूर्ण होत आहेत. त्यांच्या सुटकेसाठी तेथील हिंदू समाजाकडून असंख्य प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अद्याप यश आलेले नाही. चिन्मय दास यांची जामीन याचिका कोर्टाकडून वारंवार पुढे ढकलण्यात येत आहे.

तेथील हिंदुवर वारंवार अत्याचार होत आहे. दररोज अशा घटना समोर येत आहेत. मात्र, पोलीस प्रशासन, युनुस सरकार आरोपींवर कारवाई करताना दिसत नाहीयेत. अशा घटनांमुळे तेथील हिंदू भयभीत झाला आहे. भारत सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी तेथील हिंदूंकडून करण्यात येत आहे.

चित्रा वाघांचा षटकार उबाठाच स्टेडियमपार| Mahesh Vichare | Chitra Wagh | Anil Parab | Sushama Andhare

Exit mobile version