व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक अलेक्सी नवलनी यांचे निधन!

तुरुंगात होते कैद, १९ वर्षांची झाली होती शिक्षा

व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक अलेक्सी नवलनी यांचे निधन!

तुरुंगात कैद असलेले रशियन विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी यांचे निधन झाले आहे.यामालो-नेनेट्स प्रदेशातील तुरुंगात अलेक्सी नवलनीचा मृत्यू झाला. यामालो-नेनेट्स ऑटोनॉमस डिस्ट्रिक्टच्या फेडरल पेनिटेन्शियरी सर्व्हिसने आपल्या वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शुक्रवारी फेरफटका मारल्यानंतर अलेक्सी नवलनी यांना अस्वस्थ वाटले आणि काही वेळातच ते बेशुद्ध झाले.

कारागृह सेवेने पुढे सांगितले की, नवलनी बेशुद्ध झाल्यानंतर कारागृहाचे वैद्यकीय कर्मचारी ताबडतोब तेथे पोहोचले. यानंतर रुग्णवाहिका पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांना वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण त्यांना वाचवता आले नाही. रुग्णवाहिका डॉक्टरांनी दोषी नवलनीच्या मृत्यूची पुष्टी केली.तसेच नवलनी यांच्या मृत्यूचे कारण शोधले जात आहे.

हे ही वाचा:

विद्यार्थ्याच्या खिशात पोलिसांनीच ठेवले ड्रग्जचे पाकीट, उकळले ५ लाख!

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण नाही

शंभू सीमेवर उशिरा रात्री संघर्ष; निहंगला लागली रबरी गोळी

मुंबई विमानतळावर व्हीलचेअर न मिळाल्याने वृद्धाचा मृत्यू!

न्युज १८ च्या बातमीनुसार, रशियाचे सर्वात प्रमुख विरोधी नेते आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक अलेक्सी नवलनी यांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रशियन न्यायालयाने १९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.त्यानुसार नवलनी हे यामालो-नेनेट्स प्रदेशातील तुरुंगात शिक्षा भोगत होते. मॉस्कोपासून पूर्वेला सुमारे २३० किलोमीटर अंतरावर असलेल्या मध्य रशियातील तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले होते.

यावर रशियन सरकारने सांगितले की, कारागृह सेवा त्याच्या मृत्यूची सर्व चौकशी करत आहे. रशियाच्या तपास समितीकडून या मृत्यूची चौकशी सुरू करण्यात आली आहे. रशियन वृत्तपत्राचे संपादक आणि नोबेल शांतता पारितोषिक विजेते दिमित्री मुराटोव्ह यांनी रॉयटर्सला सांगितले की, तुरुंगात डांबून ठेवण्यात आलेले विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी यांचा मृत्यू ही हत्या आहे.ते म्हणाले की, मला असे वाटते त्यांचा मृत्यू हा तुरुंगातील परिस्थितीमुळे झाला.

Exit mobile version