27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषठाणे पोलीस आयुक्तपदी जयजित सिंग 

ठाणे पोलीस आयुक्तपदी जयजित सिंग 

Google News Follow

Related

दोन आठवड्यापूर्वी  विवेक फणसाळकर  यांच्या बदलीमुळे रिक्त झालेले  ठाणे पोलीस आयुक्तपदी एटीएसचे प्रमुख जयजित सिंग यांच्या नावाची अधिकृत घोषणा सोमवारी राज्याच्या गृह विभागाकडून करण्यात आली आहे. तसेच एटीएस  प्रमुख म्हणून विनीत अग्रवाल यांची बदली करण्यात आली आहे. अपर पोलीस महासंचालक विशेष अभियान संजय सक्सेना यांची गृहविभागाचे प्रधान सचिवपदी वर्णी लागली आहे.

ठाण्याचे  तत्कालीन पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पदोन्नती  देऊन  राज्याच्या पोलीस गृहनिर्माण मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तपद रिक्त झाले होते. ठाण्याचे पोलीस आयुक्त कुणाची वर्णी लागते यासाठी अनेक जेष्ठ अधिकाऱ्याची नावे शर्यतीत होती. या शर्यतीत एटीएस प्रमुख जयजित सिंग सर्वात पुढे होते. अखेर सोमवारी ठाणे पोलीस आयुक्त म्हणून जयजित सिंग यांच्या नावाची अधिकृत घोषणा गृहविभागाकडून करण्यात आली आहे.

हे ही वाचा:
भाजपाकडून कोकणच्या मदतीचा ओघ सुरूच

ट्विटरच्या दिल्ली, गुरगांव कार्यालयांवर छापे

एमसीएच्या लोकायुक्त ताहिलरामाणी काय निर्णय घेणार?

राज्यपालांकडे १२ आमदारांची नावं तरी दिलेली आहेत का?

जयजित सिंग यांची ठाण्याच्या पोलीस आयुक्त पदी वर्णी लागताच रिक्त झालेल्या एटीएस प्रमुख पदावर गृहविभागाने प्रधान सचिव विनीत अग्रवाल यांची बदली करण्यात आली असून विनीत अग्रवाल यांच्या जागेवर अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांची बदली करण्यात आली आहे.

ठाण्याचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून जयजित सिंग हे मंगळवारी सकाळी ठाणे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेणार असल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे. जयजित सिंग यांनी एटीएममध्ये असताना मनसुख हिरेन हत्याकांडाचा तपास करून याप्रकरणी नरेश गोर आणि विनायक शिंदे या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर हा गुन्हा एनआयए कडे वर्ग करण्यात आला होता. १९९० च्या बॅचचे बिहार कॅडर आयपीएस अधिकारी असणारे जयजित सिंग यांनी २००० ते २००५ याकालावधीत वेगवेगळ्या चार परिमंडळात पोलीस उपायुक्त काम केले आहे. तसेच २००५  मध्ये पोलीस उपायुक्त मुंबईत एटीएसचे काम बघितले होते. सीआयएसएफचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून दिल्ली येथे होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा