जय शिवराय नको अल्ला हू अकबर म्हणा!

मंत्री नितेश राणेंची राष्ट्रवादी शरद पवार गटावर टीका 

जय शिवराय नको अल्ला हू अकबर म्हणा!

औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी नेते आणि राज्यातील विविध हिंदू संघटनांकडून औरंगजेबाच्या कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. याच दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कालची ‘एक्स’ पोस्ट चर्चेत आली. फोन उचलल्यावर हॅलो ऐवजी ‘जय शिवराय’ म्हणा असा आदेश जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. दरम्यान, जयंत पाटील यांच्या पोस्टवरती भाजपा मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरांजेबाच्या विचारांवर चालणाऱ्यांनी जय शिवराय म्हणू नये अशा शब्दात मंत्री नितेश राणे यांनी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांवर टीका केली आहे.

मंत्री नितेश राणे म्हणाले,  फोन उचलल्यावर जय शिवराय नाहीतर अल्ला हू अकबर म्हटले पाहिजे. ज्यांचा पक्ष औरंगजेबाच्या विचारावर चालतो त्यांनी फोन उचलल्यावर जय शिवराय बोलू नये, नाहीतर चुकीचा नंबर  (wrong number) म्हणून ठेवावा लागेल. फोन उचलल्यावर अल्ला हू अकबर म्हणा म्हणजे कळेल कि हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्त्ये आहेत, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा नुकताच सांगली जिल्हाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी आता फोनवर हॅलोऐवजी जय शिवराय असं म्हणायचा आदेश दिला. या पुढे ज्यावेळी आपण एकमेकांशी संवाद साधू त्यावेळी फोनवर लागलीच जय शिवराय म्हणायचं असे त्यांनी स्पष्ट केली.

हे ही वाचा : 

एनसीआर : पुढील दोन दिवसांनंतर कमाल आणि किमान तापमान वाढण्यास सुरुवात होणार

अमृतसर मंदिरात ग्रेनेड हल्ल्यातील आरोपी पोलिस चकमकीत ठार!

जगभरातील दहशतवादी हल्ल्यांचे धागे पाकिस्तानशी जोडलेले असतात

कुपवाड्यात सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना घेरले

यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे, आ. अरूण लाड, आ. रोहित पाटील, माजी आमदार मानसिंग भाऊ नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार सदाशिव पाटील आदी उपस्थित होते. या मेळाव्यनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या नव्या धोरणाची पोस्ट केली. या पोस्टमध्ये ‘जय शिवराय’ असा उल्लेख करण्यात आला आहे. जयंत पाटलांच्या या पोस्टवरून मंत्री नितेश राणेंनी टीका केली.

विरोधात बोलाल तर नग्न करून मारीन... | Amit Kale | Revanth Reddy | Rahul Gandhi | Congress |

Exit mobile version