जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा… हे स्वर ऐकताच प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभा राहतो. महाराष्ट्र दिन अणि शिवजयंतीला हमखास हे गाणं मोठ्या आवाजात वाजवले जातो. हे गाणं ऐकताना महाराष्ट्रातील जनतेचा ऊर अभिमानाने भरुन येतो. आता याच ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताला महाराष्ट्र सरकारने राज्यगीतचा दर्जा दिला आहे. मंगळवारी झालेलया राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून २०२३ हे गीत अंगिकारण्यात येणार आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
महाराष्ट्राचे हे गौरव गीत सीमा आंदोलनाच्या काळात चांगलच लोकप्रिय झाले होते.कवी राजा बढे यांनी लिहिलेलं आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत शाहिर साबळे यांनी त्यांच्या खणखणीत आवाजानं अजरामर केले. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा आणि लोककलांचा मानबिंदू म्हणून शाहीर साबळे ओळखले जातात. महाराष्ट्र शाहीर ‘पद्मश्री’ कृष्णराव साबळे यांच्या या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या पहाडी आवाजात सर्वत्र गाजलेल्या या गीताला आता राज्य गीताचा दर्जा मिळाला आहे.
हे ही वाचा:
दिलासा..चारधाम यात्रेसाठी जोशीमठ सुरक्षित
अनिल परब यांचे कार्यालय तोडले, किरीट सोमय्या भेट देणार
पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताच्या अर्थसंकल्पाकडे साऱ्या जगाचे लक्ष
सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ गीताला राज्यगीताचा दर्जा दिला जाईल, अशी घोषणा या आधीच केली होती. . त्यामुळे आता सर्व मोठ्या शासकीय कार्यक्रमांमध्ये हे गीत लावले जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक राज्याला एक ठराविक गीत असावे असे केंद्र सरकारचे मत आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्रातून तीन गीतांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्र माझा गीतावर राज्य गीत म्हणून अंतिम शिक्कामोर्तब झाले. आता यापुढे शासकीय कार्यक्रमात हे गीत वाजवले जाईल.