पद्मविभूषण आणि श्री तुलसी पीठाधीश्वर चित्रकूटचे जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य महाराज शनिवारी मुंबईत येत आहेत. २ ते ५ सप्टेंबर या कालावधीत ते मुंबईत असतील. त्यांच्या आगमनामुळे त्यांच्या शिष्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या शिष्यांनी महाराजांच्या आगमनामुळे उत्साह आणि आनंदाचे वातावरण असल्याचे म्हटले आहे.
रामभद्राचार्य महाराजांचे मीडिया प्रमुख शांतनू शुक्ला यांनी ही माहिती दिली आहे. कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि उद्योगपती प्रशांत कारुळकर यावेळी उपस्थित होते. प्रशांत कारुळकर यांनी जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य महाराज यांच्या आगमनाबद्दल उत्साहित असल्याचे म्हटले आहे. या दौऱ्यादरम्यान महाराजांच्या उपदेशामुळे तसेच त्यांच्या मार्गदर्शनामुळे जीवन सार्थ होईल, असेही कारुळकर म्हणाले.
हे ही वाचा:
नेहरू मेमोरियल म्युझियम ऍन्ड लायब्ररीच्या नामांतराला राष्ट्रपतींकडून मंजुरी
उपराष्ट्रपती जगदीप धनखड मुंबईत दाखल
भारताचा वार्षिक ७.८ टक्के विकासदर अनेक आघाडीच्या अर्थव्यवस्थांच्या विकासदरापेक्षा जास्त
जॉर्जियाकडून ऑक्टोबर महिना ‘हिंदू हेरिटेज मंथ’ म्हणून घोषित
मुंबईत शनिवारी संध्याकाळी ४ वाजता महाराजांचे आगमन होणार आहे. ते अंधेरी येथे आपल्या भक्तांच्या घरी थांबणार आहेत. यावेळी गुरुदेवांचे आशीर्वाद घेण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जगद्गुरू आपल्या शिष्यांनाही यावेळी मार्गदर्शन करतील. स्वामी रामभद्राचार्य महाराजांचे उत्तराधिकारी आचार्य रामचंद्र दास हेदेखील यावेळी उपस्थित असतील.