आशियाई व पहिल्या जागतिक खो खो स्पर्धेसाठी निवड समितीत जाधव, शर्मा, गोडबोले

आशियाई व पहिल्या जागतिक खो खो स्पर्धेसाठी निवड समितीत जाधव, शर्मा, गोडबोले

भारतीय खो-खो महासंघाने आशियायी व जागतिक खो-खो स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. ४थ्या आशियाई खो-खो स्पर्धेला १२ ऑक्टोबर २०२२ पासून तर पहिल्या जागतिक खो-खो स्पर्धेला १६ ऑक्टोबर २०२२ पासून दिल्ली येथे सुरुवात होण्याचा अंदाज खो-खो महासंघाकडून व्यक्त केला जात आहे. या स्पर्धेसाठी जो भारतीय संघ निवडला जाणार आहे त्यासाठी निवडसमितीची घोषणा करण्यात आली असून भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांची निवड समितीच्या चेअरमन पदि नियुक्ती झाली आहे.

या आशियाई व जागतिक खो-खो स्पर्धेच्या निवड समितीवर महाराष्ट्रातून चेअरमनपदी डॉ. चंद्रजीत जाधव यांच्यासह महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव ऍड. गोविंद शर्मा व कार्याध्यक्ष सचिन गोडबोले यांची सदस्य म्हणून वर्णी लागली आहे. या तिघांसह उपकार सिंग (पंजाब), एस. एस. मालिक (दिल्ली), डॉ. मुन्नी जून (दिल्ली), व सुषमा सारोलकर (मध्य भारत) यांचीसुध्दा सदस्य म्हणून निवड झाली आहे.

पुणे येथील श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल बालेवाडी येथे ६ ते १९ जुलै या कालावधीत प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. संपूर्ण देशातून १२० मुले या प्रशिक्षण शिबिरासाठी निवडण्यात आली असून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी देशभरातून १२ प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

रुबैय्या सईदने यासिन मलिकला अपहरणकर्ते म्हणून ओळखले

आनंदाची बातमी: यंदाच्या गणेशाेत्सवातही धावणार माेदी एक्सप्रेस

उद्धव ठाकरेंना धक्का; खासदार राजेंद्र गावित यांच्यासह ५०- ६० शिवसेना पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदेंसोबत

मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर

 

याच १२० खेळाडूंमधून आशियाई व जागतिक खो-खो स्पर्धेसाठीचा भारतीय संघ टप्याटप्याने निवडला जाणार असल्याचे भारतीय खो-खो महासंघाचे सचिव महेंद्रसिंग त्यागी यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. संजीवराजे नाईक–निंबाळकर, खजिनदार ऍड. अरुण देशमुख, याचबरोबर खो-खो तील तमाम कार्यकर्त्यांनी निवड समितीला शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version