अनेकदा भारतीय क्रिकेटर्सच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर येत असतात. काही दिवसांपूर्वी मोहम्मद शमीचा पत्नी हसीन जहाँसोबत वाद झाला होता. यानंतर ते वेगळे झाले. आता अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाच्या संबंधित कौटुंबिक वाद समोर आला आहे.
रवींद्र जाडेजाचे वडील अनिरुद्ध सिंह यांनी सून रिवाबा हिच्यावर आरोप केले आहेत. शिवाय रवींद्र जाडेजावरही नाराजी व्यक्त केली आहे. रवींद्र जाडेजासोबत माझं कोणतेही नातं नाही. त्याच्यावर रिवाबानं जादू केली आहे. तिला फक्त पैसे हवे असतात, असा आरोप अनिरुद्ध सिंह यांनी केला आहे.
दैनिक भास्करने रवींद्र जाडेजाचे वडील अनिरुद्ध सिंह यांची मुलाखत घेतली आहे. त्यामध्ये अनिरुद्ध सिंह यांनी सून रिवाबा जाडेजावर खूप गंभीर आरोप केले आहेत. “माझा रवींद्र जाडेजा अथवा त्याच्या पत्नीसोबत कोणताही संबंध नाही. ते आम्हाला बोलवत नाहीत, अथवा आम्ही त्यांना बोलवत नाही. रवींद्र जाडेजाच्या लग्नानंतर दोन तीन महिन्यातच वादाला सुरुवात झाली. सध्या जामनगरमध्ये मी एकटाच राहतो. रवींद्र जाडेजा वेगळा राहतो. रविबाने त्याच्यावर काय जादू केली माहित नाही. मला खूप वाईट वाटतं. त्याचं लग्न झालं नसतं तर बरं झालं असतं. त्याला क्रिकेटर केले नसतं तर बरं झालं असतं. आम्ही या परिस्थितीमध्ये तर राहिलो नसतो,” अशी वक्तव्ये त्यांनी केली आहेत.
रवींद्र जाडेजाचे वडील अनिरुद्ध सिंह यांनी नुकतेच प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी मुलगा आणि सूनेवर गंभीर आरोप केले. तसेच रवींद्र जाडेजासोबत राहत नसल्याचेही त्यांनी सांगितलं. त्याशिवाय रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबावर गंभीर आरोप केले. वडिलांच्या आरोपावर रवींद्र जाडेजानं स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत मुलाखतीतील सर्व मुद्दे खोटे आणि चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं. खूप साऱ्या गोष्टी आहेत, ज्या सोशल मीडियावर लिहू शकत नाही. माझी पत्नी आणि मला बदनाम केले जाते आहे, असेही जाडेजाने म्हटले आहे.
हे ही वाचा..
काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांना मिळणार ९० हजार पगार!
पी व्ही नरसिंह रावांसह चरणसिंग आणि डॉ. स्वामिनाथन यांना ‘भारतरत्न’
“गोळीबाराच्या गंभीर घटनेवरून विरोधकांनी राजकारण करू नये”
उत्तराखंड: हल्द्वानीत झालेली दंगल आधीच नियोजित होती!
“रवींद्र याला भारतीय लष्कारात दाखल करण्याची इच्छा होती. परंतु, त्याच्या आईचा आग्रह होता त्याला क्रिकेटर बनवण्याचा. त्याच्यासाठी मी आणि त्याच्या बहिणीने खूप कष्ट केले. त्याला क्रिकेटर बनवण्यासाठी सुरक्षा रक्षकाचे काम करावे लागले. परंतु, माझ्यापेक्षा जास्त मेहनत त्याची बहिण नयनाबा हिने केली. आमच्या परिवाराचे एक ‘जड्डूस’ हॉटेल आहे. हे हॉटेल मुलगी नयनाबा पाहत आहे. रिवाबा हिला हे हॉटेल तिच्या नावावर हवे होते. त्यावरुन परिवारात भांडण सुरु झालं. मोठी मुलगी नयनाबा नसती तर रवींद्र क्रिकेटर बनला नसता. तो १७ वर्षांचा असताना त्याच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर तिने त्याच्यासाठी माझ्यापेक्षा जास्त मेहनत केली. तिच्यामुळे तो या ठिकाणी पोहचला आहे,” असं रवींद्र जाडेजाचे वडील म्हणाले.