‘ती माझी चूक होती’

सरफराज धावचित झाल्यानंतर रवींद्र जाडेजाने दिली कबुली

‘ती माझी चूक होती’

इंग्लंडविरोधातील तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा याने धाव घेण्यासाठी कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या सरफराज खान याला निमंत्रित केले. त्यामुळे सरफराज बाद झाला. याबाबत जाडेजा याने आपली चूक झाल्याचे मान्य केले आहे.

या कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजाने शतके ठोकली तर, सरफराजने दमदार अर्धशतकी खेळी केली.
जाडेजा १५३ चेंडूंमध्ये ८४ धावांवर खेळत असताना सरफराज मैदानावर उतरला. तेव्हा हळुहळू खेळ करत जाडेजा ९९ धावांवर पोहोचला होता. तोपर्यंत सरफराजने भारतासाठी आपले पहिलेवहिले अर्धशतक ठोकले होते. भारताची धावसंख्या तीनअंकी गाठण्यासाठी जाडेजासोबत सरफराजचे प्रयत्न सुरू होते. मात्र जाडेजाने सरफराजला धाव घेण्यासाठी निमंत्रित केले, मात्र तो पुढे आला नाही. मात्र सरफराज पुढे आला आणि मार्क वूडने त्याला धावचित केले.

जाडेजाने इन्स्टाग्रामवर या घटनेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. ‘मी चुकीचा कॉल दिल्याबद्दल मला सरफराजबाबत वाईट वाटत आहे. तू एक चांगली खेळी खेळलीस,’ अशी प्रतिक्रिया जाडेजाने दिली.

हे ही वाचा:

रोहित, जाडेजाच्या शतकांमुळे भारताची दमदार सुरुवात

हवामानाचा अचूक अंदाज मिळणार; इस्रोकडून अत्याधुनिक उपग्रहाचे प्रक्षेपण

अराजकाचा नवा डाव; किसान आंदोलन ०.२

‘महाभारत’चे नितीश भारद्वाज यांचा पत्नीकडून मानसिक छळ!

सरफराजने तत्पूर्वी ६६ चेंडूंमध्ये ६२ धावांची झंजावाती खेळी केली. सरफराज असा धावचीत झाल्याने रोहितनेही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. मात्र त्यानंतर जाडेजाच्या शतकाच्या जोरावर भारताने ५ बाद ३२६ अशी मजल मारली. जाडेजाने त्याचे चौथे कसोटी शतक ठोकले. जाडेजाने २१२ चेंडूंत ११० धावांची नाबाद खेळी केली. इंग्लंडच्या वूड याने १७ षटकांत ६९ धावा देऊन तीन विकेट घेतल्या. आता शुक्रवारी जाडेजा आणि कुलदीप यादव मैदानात उतरतील.

Exit mobile version