चिनी सरकार वर टीका केल्यानंतर जॅक मा गायब!

चिनी सरकार वर टीका केल्यानंतर जॅक मा गायब!

जगविख्यात व्यावसायिक जॅक मा हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. जॅक मा हे गेल्या २ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून बेपत्ता आहेत. बेपत्ता होण्याच्या आधी म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात जॅक मा यांनी चीनच्या कम्युनिस्ट सरकार विरोधात प्रचंड टीका केली होती. त्यामुळे जॅक मा यांच्या बेपत्ता होण्याकडे संशयाने पाहिले जात आहे.

गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून जॅक यांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावलेली नाही. त्यांनी स्वतःच्या टॅलेंट हंट शो च्या अंतिम भागातही हजेरी लावली नाव्हती. आफ्रिकाज बिझिनेस हिरोज नावाचा जॅक मा यांचा शो आहे. ‘द टेलिग्राफ’ च्या वृत्तानुसार जॅक मा हे टॅलेंट शो च्या परीक्षण मंडळात असणार होते. पण अचानक त्यांच्या जागी अलीबाबा कंपनीतील दुसरे उच्चाधिकारी दिसले. जॅक मा यांचा फोटो देखील कंपनीच्या संकेतस्थळावरून हटवण्यात आला आहे.

२०२० च्या ऑक्टोबर महिन्यात जॅक मा यांनी एका शिखर परिषदेच्या व्यासपीठावरून चिनी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे जॅक मा यांच्या अचानक गायब होण्यामागे चिन सरकारचा तर हात नाही ना? असा संशय जगभरातून व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version