विलेपार्ल्यात ‘जब दीप जले आना’ च्या माध्यमातून आज सायंकाळी संगीतमय मेजवानी

नगरसेवक अभिजित सामंत यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन

विलेपार्ल्यात ‘जब दीप जले आना’ च्या माध्यमातून आज सायंकाळी संगीतमय मेजवानी

भाजपाचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी आयोजित केलेल्या अटल सेवा केंद्र व आर्च एंटरप्रायझेस प्रस्तुत ‘जब दीप जले आना’ या दीपावली सांज विशेष सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन आज गुरुवार ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता करण्यात आले आहे.

सुप्रसिद्ध पार्श्वगायक, हरहुन्नरी कलाकार सुदेश भोसले यांच्या उपस्थितीत या संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले आहे. पार्ले टिळक विद्यालयाचे पटांगण, हनुमान रोड, विलेपार्ले (पू.) येथे हा कार्यक्रम सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे.

या कार्यक्रमाचे हे नववे वर्ष असून या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. या कार्यक्रमात पार्श्वगायक ऋषिकेश रानडे, अर्चना गोरे, संगीतकार मंदार आपटे, गायिका मोना कामत, तसेच बाल कलाकार काव्या खेडेकर यांचाही सहभाग असेल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री करणार आहेत.

हे ही वाचा:

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत रवी राजांनी हाती घेतले ‘कमळ’

५०० वर्षांनंतर साजरी होणार दिवाळी; २८ लाख दिव्यांच्या प्रकाशाने उजळली अयोध्यानगरी

प्रभू श्रीराम, सावरकर यांच्या अपमानाविरोधात जेएनयू कॅम्पसमध्ये संताप

पाईपलाईन खोदकामादरम्यान सापडले ‘ब्रिटीश कालीन बॉम्ब’

 

अभिजित सामंत यांच्यासह अंजली सामंत, सुनील मोने यांच्या आयोजनाखाली हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

 

न्यूज डंकाचा दिवाळी अंक सवलतीत उपलब्ध

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदाचे ३५१वे वर्ष असल्यामुळे न्यूज डंका या वेबपोर्टल, यूट्युब चॅनेलच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या इतिहासाला वाहिलेला शिवरायांचा आठवावा प्रताप हा दिवाळी अंक सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अंकाची मूळ किंमत ५०० रुपये असून अभिजित सामंत यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात हा अंक ४०० रुपयात उपलब्ध करून देण्यात आला आहे.

यासंदर्भात अभिजित सामंत यांनी सांगितले की, प्रतिवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन आम्ही करतो. दिवाळीच्या निमित्ताने लोकांना लोकप्रिय गाण्यांची, संगीताची भेट देण्याचा आमचा मनोदय असतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवरायांचा आठवावा प्रताप हा दिवाळी अंकही आम्ही सवलतीच्या दरात उपलब्ध करून देत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदिप्यमान कारकीर्दीचा आढावा या अंकातून घेण्यात आला आहे. तो अंक प्रत्येकाने संग्रही ठेवावा असा आहे.

 

Exit mobile version