स्वातंत्र्यदिन जसजसा जवळ येत आहे, तसतसे देशाच्या विविध भागातून लोक आपापल्या ठिकाणी तिरंगा रॅली काढत आहेत. देश आणि स्वातंत्र्य सैनिकांबद्दल असलेले आपले प्रेम आणि आपुलकीचे प्रदर्शन रॅलीतून दाखवत आहेत. जम्मू- काश्मीरच्या रियासीमध्ये मंगळवारी (१३ ऑगस्ट) चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर ७५० मीटर लांबीची तिरंगा रॅली काढण्यात आली.
रियासीचे डीसी स्पेशल पॉल महाजन म्हणाले की, जगाला आपल्या देशाबद्दलचे प्रेम दाखवण्यासाठी सुमारे ७५० मीटर लांब तिरंगा हातात घेऊन रॅली काढण्यात आली. यावेळी रॅलीत सहभागी असलेल्या शाळकरी मुले आणि इतर लोकांनी ‘भारत माता की जय’…’वंदे मातरम’च्या घोषणा दिल्या. संपूर्ण रॅली दरम्यान पोलिसांचा सर्व बाजूने बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
७८ व्या स्वातंत्र्य दिनापूर्वी जम्मू-श्रीनगर महामार्गावर वाहनांच्या तपासणीसह सुरक्षा कडक करण्यात आली आहे. उधमपूरचे पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) प्रल्हाद कुमार यांनी, कोणतेही वाहन अथवा संशयास्पद व्यक्ती निदर्शनास दिसल्यास पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
हे ही वाचा :
कोलकातामधील डॉक्टर बलात्कार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे
भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘अहिल्या भवन’ मानखुर्दमध्ये उभे राहणार!
शेख हसिनांसाठी बांगलादेशात तुरुंग सज्ज?
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंशी पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी साधणार संवाद !
अरुणाचल प्रदेशमध्ये देखील कामेंग जिल्ह्यातील सेप्पाच्या रस्त्यावरून ६०० फूट लांबीची ‘तिरंगा रॅली’ काढण्यात आली. माहितीनुसार, या कार्यक्रमात विविध स्थानिक शाळांमधील २,००० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या विद्यार्थ्यांमध्ये अरुणाचल प्रदेशचे गृहमंत्री मामा नाटुंग आणि स्थानिक आमदार हायंग मांगफी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
#WATCH | Reasi, J&K: Tiranga rally was taken out with a 750 m long tricolour, on the World's highest railway bridge on Chenab river ahead of Independence Day. pic.twitter.com/za0LuOqpyc
— ANI (@ANI) August 13, 2024