जम्मू काश्मीरच्या डोडामधील असार भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक अजूनही सुरू आहे. या चकमकीत चार दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. त्याचवेळी भारतीय लष्कराच्या ४८ राष्ट्रीय रायफल्सच्या एका कॅप्टनने आपले बलिदान दिले आहे. चकमक सुरु असताना शोधमोहीम दरम्यान परिसरात रक्ताचे डाग आढळून आले, त्यानंतर सुरक्षा दलांनी अधिक कारवाई सुरू केली. शोधमोहिमे दरम्यान सुरक्षा दलांनी एम ४ रायफल जप्त केली आहेत. याशिवाय दारूगोळा आणि रसद सामग्रीही जप्त करण्यात आली आहे. यासोबतच तीन बॅग्सही जप्त करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने दोडाच्या असार भागात शोध मोहीम सुरू केली होती. दरम्यान, याचदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सर्च पथकाचे नेतृत्व करताना झालेल्या चकमकीत लष्कराचा एक कॅप्टन जखमी झाला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कॅप्टन दीपक सिंग असे हुतात्मा झालेल्या लष्कर कॅप्टनचे नाव आहे.
हे ही वाचा:
स्वातंत्र्यदिन सोहळ्यात महिला पंचायत प्रतिनिधी आणि लखपती दीदी असणार विशेष अतिथी !
आठवीच्या प्रश्नपत्रिकेत पाच पैकी चार प्रश्न इस्लामशी निगडीत
‘पाकिस्तान विलीन होईल किंवा नष्ट होईल’
“मनोज जरांगे हे बिनबुडाचा लोटा”
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, हुतात्मा कॅप्टन दीपक यांनी आपल्या पथकाचे नेतृत्व करत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आपल्या जवानांना निर्देश देत राहिले. दोन्ही बाजुंनी झालेल्या गोळीबारात कॅप्टन दीपक यांना गोळी लागली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना वीर मरण आले. दरम्यान, सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकांची परिसरात शोधमोहीम सुरू आहे.