“जवानांसोबत सीमेवर दिवाळी साजरी करणे हे माझं भाग्य”

देशभरात आज दिवाळी उत्साहात साजरी होत असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कारगिलमध्ये दाखल झाले आहेत.

“जवानांसोबत सीमेवर दिवाळी साजरी करणे हे माझं भाग्य”

देशभरात आज दिवाळी उत्साहात साजरी होत असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कारगिलमध्ये दाखल झाले आहेत. दिवाळी सण भारतीय जवानांसोबत साजरा करण्यासाठी पंतप्रधान मोदी कारगिल येथे दाखल झाले आहेत. कारगिलच्या द्रास सेक्टरमध्ये पंतप्रधान मोदींनी हजेरी लावली. मागच्या नऊ वर्षांपासून नरेंद्र मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. भारतीय जवानांना आत्मविश्वास देण्यासाठी नरेंद्र मोदी अशी अनोखी दिवाळी साजरी करत असतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी जवानांना संबोधित केले असून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जवानांसोबत सीमेवर दिवाळी साजरी करणे हे माझं भाग्य आहे अशा भावना मोदींनी बोलताना व्यक्त केल्या आहेत.

“कारगिलची दिवाळी कधीच विसरता येणार नाही. कारगीलने प्रत्येक वेळी भारताचा विजय केला आहे. हे भारताच्या विजयाचं प्रतीक आहे, दिवाळी हा दहशतवाद्यांच्या अंताचा उत्सव आहे त्यामुळे मी कारगिलच्या आठवणी कधीच विसरू शकत नाही” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“माझ्यासाठी मागील कित्येक वर्षापासून देशातील सैनिक हेच माझे कुटुंबीय आहेत. तुमच्यामध्ये आल्यानंतर माझी दिवाळी आणखी गोड होते. माझ्या दिवाळीचा उत्साह तुमच्याजवळ आहे. मला मागील कित्येक वर्षांपासून तुमच्यासोबत दिवाळी साजरी करता येते. हे माझे सौभाग्यच आहे,” अशा भावना नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या आहेत.

सैनिक हे देशाचे महत्त्वाचे स्तंभ आहेत. तुम्ही देशाच्या सीमेवर आहात म्हणून देशातील लोक सुखात आहेत. देशाच्या ताकदीबद्दल ऐकल्यानंतर सैनिकांचेही मनोबल वाढत असेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

… आणि भारत- पाकिस्तान सामन्याच्या शेवटच्या दोन ओव्हर पाहण्यासाठी विमान उड्डाण लांबवलं?

राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल ही माहिती आली समोर

गांधी कुटुंबाला दणका, राजीव गांधी फाउंडेशनचे लायसन्स रद्द

आज देशातील नागरिक स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी झालेला आहे. गरीब व्यक्तीला पक्के घर, पिण्याचे पाणी, स्वयंपाकासाठी गॅस वेळेवर मिळतो, तेव्हा देशातील सैनिकालाही अभिमान वाटतो. सैनिकाच्या शहरात, गावात जेव्हा सुविधा पोहोचतात तेव्हा सीमेवर त्याला चांगले वाटत असते, असेही मोदी म्हणाले.

Exit mobile version