ठरलं !! रश्मी शुक्लाच होणार पोलीस महासंचालक!

तिढा सुटला, चर्चेला मिळाला विराम

ठरलं !! रश्मी शुक्लाच होणार पोलीस महासंचालक!

राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा तिढा अखेर सुटला. महाराष्ट्र लोकसेवा आयोग समितीच्या अध्यक्षपदी रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर रिक्त होणाऱ्या पोलीस महासंचालकपदी कोण येणार याची उत्सुकता पोलीस दलाला लागली होती. सुरुवातीलाच जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या नावाची चर्चा पोलीस दलात सुरू होती, परंतु अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालकपदापेक्षा मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी उत्सुक असल्याची चर्चा सुरू होती या चर्चेला अखेर विराम मिळाला आहे.

जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) रजनीश सेठ यांच्याकडून राज्य पोलिसांची सूत्रे हाती घेण्यास तयार आहेत, ते लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारणार आहेत. सध्या शुक्ला डीजी पदावर केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत. राज्यात, शुक्ला यांनी यापूर्वी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. पुणे पोलिस आयुक्त आणि राज्य गुप्तचर शाखेचे संचालक म्हणून त्यांनी धुरा सांभाळली आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रपतींवर हत्येच्या कटाचा आरोप करणाऱ्या श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांची उचलबांगडी

इंडिगो विमानात सीट गायब

उत्तर प्रदेशात बारावीच्या विद्यार्थ्याला मारहाण करत तोंडावर केली लघुशंका!

नागपुरात होमगार्डनेचं तरुणांना मारहाण करत लुटले १० हजार

शुक्ला हे राज्यातील सर्वात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. राज्य सरकारने ज्येष्ठतेच्या पातळीनुसार केंद्रीय गृह मंत्रालयाला यादी सादर केली आहे. एका उच्चपदस्थ अधिकारी यांच्यामते, शुक्ला यांच्यानंतर जेष्ठ आयपीएस अधिकारी म्हणून महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप बिश्नोई आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे आहेत. शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आहेत तर बिश्नोई आणि फणसाळकर हे १९८९ बॅचचे आहेत. शुक्ला ३० जून २०२४, बिष्णोई ३१ मार्च २०२४ आणि फणसळकर ३१ मार्च २०२५ रोजी निवृत्त होतील.

 

४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग समितीच्या  अध्यक्षपदी नियुक्ती केली. तथापि, त्यानंतर त्यांना नवीन पोलीस महासंचालक यांची नियुक्ती होत नाही तो पर्यत कार्यभार प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले होते. १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सेठ हे ३१ डिसेंबर २०२३ रोजी निवृत्त होणार आहेत.

Exit mobile version