23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषते १५० वर तर हे अजून ‘५०’ वरच

ते १५० वर तर हे अजून ‘५०’ वरच

शिंदे-फडणवीस डबल इंजिन सरकार वेगाने करतंय काम

Google News Follow

Related

मुंबई महापालिका निवडणूक अद्याप कधी होणार हे गुलदस्त्यात असतानाही भाजप आणि मित्र पक्षाने जय्यत तयारी सुरू केली आहे. राज्यभरात प्रचाराचे नियोजन केलं असून १५० जागांचे टार्गेट ठेवले आहे. तशी घोषणाही करण्यात आली आहे. एकिकडे शिंदे-फडणवीस डबल इंजिन सरकार वेगाने काम करत महाविकास आघाडीच्या आरोपांकडे दुर्लक्ष करत वाटचाल करत आहे. तर दुसरीक़डे आदित्य ठाकरे मविआ सरकार कोसळल्यापासून आहे त्याच जागी उभे आहेत, असे चित्र दिसते. इथून ते इंचभरही पुढे सरकताना दिसत नाहीयेत. त्यांची गाडी ५० खोके, गद्दार यांच्यापुढे जात नाहीए. ते वारंवार याच वाक्यांवर अडून बसलेत, कारण त्यांच्याकडे या वाक्यांशिवाय काहीच उरलेले नाही, अशी शक्यता आहे. त्याउलट शिंदे-फडणवीस सरकार आपल्या कामाने महाविकास आघाडीला नेस्तनाबूत करत आलेत. त्यामुळेच त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मित्रपक्षांसोबत १५० जागा मिळविण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या मेट्रोचे काम जलद गतीने सुरू केलेय. आरे कारशेडच्या मुद्द्यावरून लटकलेल्या मेट्रोला गती दिली आहे. काही ठिकाणी मेट्रो सुरूही केलीय. बुलेट ट्रेनचे काम मार्गी लावलेय. नुकताच बुलेट ट्रेनसाठी गोदरेजच्या जमिनीचा मुद्दा निकाली निघाला. मुंबईकरांचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे खड्डे, तोही मार्गी लावलाय. मुंबईतील रस्ते आता सीमेंटचे करणार असल्याची घोषणा करून मुंबईकरांना शिंदे-फडणवीस सरकारने दिलासा दिलाय. अशा अनेक गोष्टी या सरकारने मार्गी लावल्या आहेत.

हेही वाचा :

बीबीसीच्या कर्मचाऱ्यांना फोन बंद ठेवण्याचे आदेश; आयकर खाते धडकले

काश्मीरच्या लिथियम साठ्यावर दहशतवाद्यांचा डोळा

पुलावामा हल्ल्यातील जवानांना देशभरातून श्रद्धांजली

खरं म्हणजे शिंदे-फडणवीस सरकार येऊन अवघे सहा-सात महिने झाले. हा कार्यकाळ पाहता तर तो फार कमी आहे. मविआ सरकारला जे अडीच वर्षात जमले नाही, ते शिंदे-फडणवीस सरकारने सहा-सात महिन्यात करून कामाचा धडाका लावलाय. त्यामुळे मविआच्या नेत्यांमध्ये पोटदुखी वाढल्याचे चित्र आहे. शिंदे-फडणवीस जी कामं करताहेत ती लोकांच्या नजरे समोर दिसताहेत. मेट्रोचे जे रखडलेले काम होते, ते वेगाने सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील रस्ते सीमेंटचे करून खड्डेमुक्त मुंबई बनवू अशी घोषणा केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पहिले पैसे देऊ नका, घोटाळा झालाय, एवढे पैसे कसे लागतात, हा लोकांचा पैसा आहे, असे नाना तऱ्हेचे आरोप केले. खरे तर, मुंबईचे रस्ते जर खड्डेमुक्त होत असतील तर आदित्य ठाकरे यांच्या पोटात खड्डा पडण्याचे नेमके कारण उमगलेले नाही. जो पैसा महानगर पालिकेच्या तिजोरीत आहे, तो मुंबईकरांचाच आहे, मग त्यांच्या सुखसोयीसाठी तो वापरला तर त्यात गैर काय असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. मुंबईच्या प्रगतीसाठी, मुंबईकरांच्या सुरक्षित प्रवासासाठी हा पैसा वापरलाच गेला पाहिजे, यात काही वावगं नाही अशी जनसामान्यांचीही भावना आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई चकाचक करायची आहे. त्यामुळे पटापट निर्णय घेतले. त्याचीच काही लोकांना पोटदुखी होतेय. पण अशा टीकांकडे लक्ष देत नाही. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझा कामावर भर आहे आणि ते मी करत राहणार.

मविआ सरकारवर मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला. त्या सरकारमध्ये निर्णय घेण्याची क्षमता नव्हती. आता मात्र संधी आहे. त्यामुळे आम्ही पटापट निर्णय घेत आहोत. आमचं सरकार हे गतीमान सरकार आहे. निवडणुका येतील आणि जातील. आम्हाला काम करण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीचं आम्ही सोनं करणार आहोत, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. खरे तर गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीलाही ही सगळी कामे करण्याची संधी होती. कोरोनाचा अडथळा सोडला तरी मिळालेल्या सत्तेतून लोकांची कामे करण्यावर भर देता आला असता, पण ते करण्याऐवजी त्यांनी केंद्र सरकारवर टीका करणे आणि तत्कालिन विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला लक्ष्य करणे, त्यांना डिवचणे, त्यांची हेटाळणी करणे यातच वेळ घालवला. त्यामुळे प्रत्यक्ष कामातून त्यांनी आपले कर्तृत्व सिद्धच केले नाही.

गेल्या २५ वर्षात शिवसेनेची सत्ता मुंबई महानगरपालिकेत राहिलेली आहे. त्या काळात मुंबईच्या वाट्याला काय आले. तुंबलेले नाले, रस्त्यातले खड्डे, भयंकर प्रदूषण, वाहनांची गर्दी, अनधिकृत बांधकाम, अनियोजित विकास. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून अवघ्या सात महिन्यांत सरकार मुंबईसाठी टार्गेट ठेवून काम करतंय. वंदे भारत, मेट्रो, बुलेट ट्रेन, ट्रान्स हार्बर लिंक,  खड्डे मुक्त मुंबई, मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर करण्याची तयारी, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना. असे कार्यक्रम शिंदे-फडणवीस सरकार करतेय.

लोकांच्या मनात मुंबई महानगरपालिकेत वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्यांकडून जी फसवणूक झाली त्याविरोधात संताप आहे.

मुंबईचा विकास आणि मुंबईची प्रगती होण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार झटतेय. दुसऱ्या बाजूला सत्ता गमावल्यानंतर सुद्धा आदित्य ठाकरे पर्यावरणाच्या नावावर अशा विकासप्रकल्पांना विरोध करत आहेत. बुलेट ट्रेन आणि मेट्रोमुळे ऑक्सिजन नसेल तर काय करणार, असा सवाल ते उपस्थित करतात. मग प्रश्न विचारावासा वाटतो की, तुमच्या २५ वर्षाच्या काळात ३८ हजार झाडे तोडली त्याचे काय. त्यात बिल्डरांसाठी २१ हजार झाडे तोडण्यात आली. त्यामुळे लोकांना पर्यावरणांच्या नावाखाली जे बहकवले जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि मित्रपक्षांनी १५० जागांचे लक्ष्य बाळगले आहे. त्यादिशेने त्यांची पावले पडत आहेत. पण ठाकरे गट मात्र अद्याप ५० खोक्यांवरच अडकला आहे. प्रत्येक भाषणात शिंदे गटाला बदनाम करण्यापलिकडे काहीही होताना दिसत नाही. एकनाथ शिंदे आणि ४० आमदार शिवसेना सोडून गेलेत हे वास्तव अजूनही त्यांना विसरता येत नाही. त्यांना कसे रोज लक्ष्य करता येईल याचेच सध्या प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच भाजपा व मित्रपक्षांनी १५० जागांचे लक्ष्य बाळगले असताना ठाकरे गट मात्र असे कोणतेही विधान तूर्तास करताना दिसत नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा