22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषइटलीचा 'रोम' हर्षक विजय

इटलीचा ‘रोम’ हर्षक विजय

Google News Follow

Related

युरो २०१६ आणि २०१८ फुटबॉल विश्वचषक या दोन्ही मानाच्या स्पर्धांमध्ये इटली संघ दिसला नाही कारण या दोन्ही स्पर्धांच्या पात्रता फेरीतच इटली गारद होऊन बाहेर पडला होता पण याचा वचपा इटलीने यावेळी घेतला आणि युरो २०२० ही स्पर्धा नुसती जिंकली नाही पण या स्पर्धेतील एकही सामना न हरण्याचा विक्रमही कायम ठेवला. ६७व्या मिनीटात गोल करून अनुभवी लिओनार्डो बोनुची याने इटलीला १-१ अश्या बरोबरीत आणले आणि मग सामना पेनल्टी शूटआऊट पर्यंत पोहचला आणि इटलीने पेनल्टी शूटआऊट ३-२ अश्या गोल फरकाने जिंकत सामना आणि युरो चषक दोन्ही आपल्या खिशात घातले.

११ जून ते ११ जुलै असा एक महिन्याचा काळ, २४ संघ, एकूण ५१ सामने, सगळे संघ मिळून जवळपास ६३० खेळाडू, १४२ गोल आणि केवळ एक विजेता. हा होता थरार युरो २०२०. ही स्पर्धा खरतर २०२० मध्येच होणार होती परंतु कोरोनामुळे ही २०२१ मधे खेळवली गेली पण विपणनाच्या दृष्टिकोनातून या स्पर्धेचं नाव युरो २०२० असच ठेवण्यात आलं. या स्पर्धेची सुरुवात झाली त्यावेळी पहिल्या सामन्यातला एक संघ इटली होता आणि स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुद्धा इंग्लंड समोर इटलीचे आव्हान होते. कोणत्याही स्पर्धेत असा प्रसंग क्वचितच पाहायला मिळतो.

युरो २०२० च्या अंतिम फेरीतील सामन्यापूर्वी जो अंतिम सोहळा झाला तो देखील बघण्यासारखा होता. विंब्ले स्टेडियम हे प्रेक्षकांनी संपूर्णपणे भरलेले होते, नुसते स्टेडियम नाही तर स्टेडियमच्या बाहेर देखील असंख्य प्रेक्षकांनी सामना पाहण्यासाठी गर्दी केली होती. डोळ्यांना सुखावणारा आणि डोळे दिपून टाकणारा असा हा अंतिम सोहळा होता.

सामना सुरू झाला तेव्हा कोणता संघ जिंकणार यामध्ये मतमतांतरे होती आणि कोणत्याही फुटबॉल विश्लेषकाला ठामपणे सांगता येत नव्हते की कोणता संघ जिंकणार ते आणि अश्यातच सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटात लूक शॉ ने गोल करत इंग्लंडला १-० अशी बढत मिळवून दिली. कायरेन ट्रिपियरच्या क्रॉस पासचा फायदा घेत लूक शॉने हा गोल केला.

सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये इंग्लंडचे पारडे जड होते. इंग्लिश खेळाडू आपल्या खेळातून अजून एक गोल कसा करता येईल हे पाहत होते. दुसरीकडे इटलीने देखील गोल करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले पण त्यांना हवे ते यश आले नाही. सामन्याच्या ७व्या आणि ४१व्या मिनीटात इटलीला फ्री किक् मिळाली पण त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही. पहिल्या हाफ मधे बॉल पझेशन सोडले तर इटलीच्या हाती निराशाच आली.

सामन्याच्या दुसऱ्या हाफमधे इटली हळूहळू खेळात आणि आपल्या मूळ रंगात परत येतेय असं दिसून येतं होतं. ५० व्या मिनिटात फेड्रिको कियेझा याने इटलीकडून गोल करण्याचा प्रयत्न केला पण इंग्लंडचा गोळकीपर जॉर्डन पीकफोर्ड याने तो प्रयत्न हाणून पाडला. इटलीचे गोल करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच त्यांना ६७व्या मिनिटात कॉर्नर मिळाला आणि या कॉर्नरचा फायदा घेत अनुभवी लिओनार्डो बोनुची‌ याने गोल करत सामना १-१ अश्या बरोबरीत आणला.,

९० मिनिटांचा खेळ संपला त्यावेळी दोन्ही संघांनी प्रत्येकी १ १ गोल केला होता त्यामुळे सामना अधिक वेळात खेळवण्यात आला. ३० मिनिटांच्या या अधिक वेळातही कोणत्याच संघाला गोल करण्यात यश मिळालं नाही त्यामुळे सामना पेनल्टी शूटआऊट मधे गेला. दोन्ही संघांना पेनल्टी बॉक्स मधून गोल करायच्या प्रत्येकी ५ संधी मिळाल्या. पेनल्टी शूटआऊट मधे गोलकीपरचा कस लागतो आणि गोलकीपरसाठी ही एक सुवर्ण संधी असते प्रकाशझोतात येण्यासाठी. इटलीच्या जियानलुगी डोनारूमा आणि इंग्लंडच्या जॉर्डन पीकफोर्ड या दोघांकडे साऱ्या जगाचे लक्ष या पेनल्टी शूटआऊटमुळे वेधलं गेलं.

संपूर्ण सामन्यामध्ये डोनारुमा पेक्षा पीकफोर्डने चांगली कामगिरी केली होती त्यामुळे पीकफोर्ड इटलीला रोखून धरेल असं मत फुटबॉल विश्लेषकांचं होतं मात्र प्रत्यक्षात पेनल्टी शूटआऊटमध्ये डोनारूमाने चांगली कामगिरी करत आपली छाप पाडली. इंग्लंडला रोखण्यात त्याला यश आलं.इटलीकडून लिओनार्डो बोनुची, फेड्रीको बर्नार्डदेश्ची आणि डॉमिनिको बरार्डी यांनी पेनल्टी शूटआऊट मधे गोल केले आणि इटलीला युरो २०२० ची स्पर्धा जिंकण्यात यश आलं.

युरो २०२० स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून डोनारूमाला गौरविण्यात आलं. त्याचप्रमाणे मानाच्या ‘गोल्डन बूट’ या किताबाचा मानकरी ठरला पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा