26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषडीपफेक प्रकरणी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना हवीय घसघशीत नुकसान भरपाई!

डीपफेक प्रकरणी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना हवीय घसघशीत नुकसान भरपाई!

पंतप्रधान होण्यापूर्वी बनवला होता डीपफेक व्हिडिओ

Google News Follow

Related

इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी डीपफेक व्हिडिओ प्रकरणी नुकसान भरपाई मागितली आहे.एका ४० वर्षीय आरोपीने त्याच्या ७३ वर्षीय वडिलांसोबत मेलोनीचा यांचा डीपफेक व्हिडिओ बनवून एका अमेरिकन ॲडल्ट कंटेंट वेबसाइटवर पोस्ट केला होता.या प्रकरणी पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी नुकसान भरपाई मागितली आहे.

ब्रिटिश मीडिया बीबीसीनुसार, जॉर्जिया मेलोनी पंतप्रधान होण्यापूर्वी म्हणजेच २०२२ मध्ये आरोपीकडून डीपफेक व्हिडिओ बनवण्यात आला होता.व्हिडिओमध्ये एका ॲडल्ट फिल्म स्टारच्या चेहऱ्यावर जॉर्जिया यांचा चेहरा लावण्यात आला होता.या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचा:

“आमच्याकडे दोन रुपयेही नाहीत” बँक खाती गोठवल्यानंतर काँग्रेसची रडारड

चॅट जीपीटी म्हणतं, यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई आणि मुंबईचा संघ चमकणार

केंद्राने रोहिंग्यांना राहण्याचा अधिकार नाकारला

केजरीवाल यांना वाटू लागली अटकेची भीती!

पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी १ लाख युरोची भरपाई मागितली आहे. या प्रकरणी जॉर्जिया मेलोनी २ जुलै रोजी सासरी न्यायालयात साक्ष देणार आहेत.आरोपींनी जॉर्जिया मेलोनी यांनी डीपफेक व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मोबाईलचा वापर केला होता.आरोपींकडून वापरण्यात आलेल्या मोबाईलद्वारे पोलीस आरोपींपर्यंत पोहचले, असे बीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे.

हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना मदत करण्यासाठी या रकमेचा वापर करण्यात येणार असल्याचे जॉर्जिया मेलोनी यांच्या वकील मारिया गिउलिया मारोंगीयू यांनी सांगितले.पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी जी भरपाई मागत आहेत ते योग्यच आहे.अशा गुन्ह्यांना बळी न पडता महिलांनी आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन देखील वकील मारिया गिउलिया मारोंगीयू यांनी केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा