‘पंतप्रधान मोदी आले असते तर बरे झाले असते, आज आम्ही सर्वांकडून भीक मागत आहोत’

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे वक्तव्य

‘पंतप्रधान मोदी आले असते तर बरे झाले असते, आज आम्ही सर्वांकडून भीक मागत आहोत’

पाकिस्तानमध्ये १५-१६ ऑक्टोबर रोजी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषद होणार आहे. यासाठी भारताकडून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात पोहोचले आहेत. दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारतासोबतच्या संबंधांबाबत मत मांडले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानात आले असते तर बरे झाले असते.

पत्रकार बरखा दत्त यांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान नवाझ शरीफ म्हणाले की, मी सुरुवातीपासून भारतासोबत चांगल्या संबंधांचे समर्थन करत आहे. मला आशा आहे की, आमच्यातील संबंध पुन्हा सुधारतील आणि आगामी काळात मला पंतप्रधान मोदींसोबत बसून बोलण्याची संधी मिळेल.

मुलाखतीदरम्यान नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थितीवरही चर्चा केली. ते म्हणाले की, आमचा देश संपूर्ण जगाकडून पैसे मागत आहे, तर भारत चंद्रावर जात आहे. भारताकडे ६०० अब्ज डॉलर्सचा खजिना आहे. ते G२० शिखर परिषद आयोजित करत आहे, तर आम्ही चीनसह अरब देशांसमोर प्रत्येकी १ अब्ज डॉलर्सची भीक मागत आहोत. अशा परिस्थितीत काय इज्जत राहिली आहे?, असे नवाझ शरीफ म्हणाले.

हे ही वाचा :

विधानसभेचे बिगुल वाजले; २० नोव्हेंबरला मतदान तर २३ रोजी लागणार निकाल

‘सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी कुदळ मारून, नारळ वाढवून केले भूमिपूजन’

मतदानात सहभागी होऊन लोक ईव्हीएमबाबतच्या शंकांचे उत्तर देतात!

भारताला मिळणार ३१ प्रिडेटर ड्रोन; अमेरिकेशी ३२ हजार कोटींचा करार!

दरम्यान, मुलाखतीत नवाझ शरीफ यांनी भारताला दिलेले वचन मोडल्याचे सांगितले. ते म्हणाले की, कारगिल युद्धात जे काही झाले ते आमची चूक होती. आम्ही लाहोर करार मान्य केला नाही. यासाठी आपणच दोषी आहोत, आम्ही असे करायला नको होते, असे नवाझ शरीफ म्हणाले.

Exit mobile version