माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, माझे आयुष्य उध्वस्त झाले, मिहीरची पोलिसांपुढे कबुली!

आरोपी चालकाला न्यायालयीन कोठडी

माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, माझे आयुष्य उध्वस्त झाले, मिहीरची पोलिसांपुढे कबुली!

वरळी ‘हिट अँड रन’ ही घटना माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे, या एका चूकीमुळे माझे संपूर्ण आयुष्य उध्वस्त झाले आहे अशी कबुली मिहीर शहा याने पोलिसांकडे दिली आहे. या अपघातामुळे मी प्रचंड घाबरलो होतो, त्यामुळे मी स्वतःला वाचविण्यासाठी पळून गेलो, मला कोणी ओळखू नये यासाठी मी दाढी,केस कमी केल्याचे मिहीर याने पोलिसांकडे कबूल केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.दरम्यान या घटनेतील दुसरा आरोपी चालक बिदावत याला गुरुवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

वरळीत रविवारी पहाटे झालेल्या ‘हिट अँड रन’च्या घटनेतील मुख्य आरोपी मिहीर शहा याला मंगळवारी विरार येथुन वरळी पोलिसांनी अटक केली आहे. या अपघातात मिहीर चे वडील राजेश शहा आणि चालक राजऋषी बिदावत यांना रविवारीच अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर मिहीर हा आपल्या कुटूंबियासह पळून गेला होता, ६० तासांनी मिहीर हा पोलिसांच्या हाती लागला. मिहीर शहाचे वडील राजेश शहा हे पालघर जिल्ह्याचे शिवसेना (शिंदे गट)चे उपनेते होते, सोमवारी न्यायालयाने या प्रकरणात त्याना जामीनावर सोडण्यात आले आहे.

हे ही वाचा:

हरियाणात काँग्रेसला झटका, सोनीपतचे महापौर निखिल मदान यांचा भाजपात प्रवेश!

लॉरेन्स बिश्नोई टोळीवर पंजाब पोलिसांची मोठी कारवाई !

शंकराचार्यांना राहुल गांधींच्या पालख्या नाचवण्याचे काम उरले आहे का?

बिहारमधील नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयकडून कथित मुख्य सूत्रधाराला अटक

मिहीर शहा मंगळवारी अटक केल्यानंतर बुधवारी त्याला शिवडी न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने त्याला १६ जुलै पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान मिहीर ने पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली असून ” अपघातानंतर मी खूप घाबरलो होतो, मला काहीच सुचत नव्हते, मोटार थांबवली असती तर लोकांनी आम्हाला खूप मारले असते या भीतीने मी गाडी न थांबवता पळून गेलो, त्यानंतर पोलिसांच्या भीतीने मी लपून बसलो होतो,माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक होती, एका चूकीमुळे माझे संपूर्ण आयुष्य उध्वस्त झाले असल्याची कबुली मिहीर ने पोलिसां समोर दिली आहे.

पोलिसांच्या तपासात मिहीर याने जुहू येथील बार मध्ये व्हिस्कीचे चार पेग रिचवले होते, त्यानंतर त्याने, बीएमडब्ल्यू या मोटारीत बोरिवली ते मरीन ड्राईव्ह या प्रवासात ४ बिअर चे टिन रिचवले, मरीन ड्राईव्ह येथून परत जात असताना मिहीर लघुशंकेसाठी एका ठिकाणी थांबला, तेथून त्याने चालकाला बाजूला करून मोटारीचा ताबा स्वतःकडे घेतला होता अशी माहिती पोलीस तपासात समोर आली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान जुहू येथील बार मालकाने एका वृत्तवाहिणीला दिलेल्या मुलाखतीत मी मिहीर ला ओळखत नाही, परंतु त्याच्या सोबत असलेला त्याचा एक मित्र आमचा नियमित ग्राहक आहे, त्याच्यासोबत मिहीर बार मध्ये आला होता, मिहीर ने आपले ओळखपत्र दाखवले त्यात त्याचे वय २७ होते असे बार मालकाने म्हटले आहे.

Exit mobile version