सिद्दीक कप्पननेच कपिल मिश्रा, परवेश वर्मा यांना मारण्यासाठी पीएफआय हिट पथकाला निर्देश दिले

सिद्दीक कप्पननेच कपिल मिश्रा, परवेश वर्मा यांना मारण्यासाठी पीएफआय हिट पथकाला निर्देश दिले

दिल्लीतील हिंदूविरोधी दंगलीनंतर भाजप नेते परवेश वर्मा आणि कपिल मिश्रा यांची हत्या करण्यात आली होती. ही हत्या करण्यासठी पत्रकार सिद्दिक कप्पन याने पीएफायच्या हिट स्कोडला कसे निर्देश दिले होते हे एका अहवालातून समोर आले आहे. १९ मार्च २०२४ स्थानिक माल्य्याळम आऊटलेट जन्माभूमीने प्रकाशित केलेल्या एका वृत्तानुसार दिल्लीतील २०२० च्या हिंदूविरोधी दंगलीत पीएफआय सदस्यांचे हिंदूंना लक्ष्य करण्याच्या भाजपच्या नेत्याच्या प्रयत्नामुळे संतप्त झालेल्या सिद्दिक कप्पान याने असे आदेश दिले. कपिल मिश्रा आणि परवेश वर्मा यांना मारण्यासाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या हिट स्क्वॉड कमांडर कमल केपी, मूळ मलप्पुरम याला अटक करण्यात आली आहे.

सप्टेंबर २०२० मध्ये केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील मांजरी येथे बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नियंत्रित ग्रीन व्हॅली अकादमीमध्ये झालेल्या बैठकीत हा आदेश देण्यात आला. एनआयएने पीएफआय सदस्य कमाल केपी आणि त्याच्या हिट स्क्वॉड सदस्य अन्शद बदरुद्दीन आणि फिरोज खान यांची चौकशी केली तेव्हा हा खुलासा झाला. विशेष म्हणजे ३ मार्च २०२३ रोजी कमल केपी यांना केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील मेलात्तूर येथून २०२० मध्ये हातरस येथे एका १९ वर्षीय दलित महिलेच्या मृत्यूनंतर अशांतता निर्माण करण्याचा आणि निषेध भडकवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. कमाल केपी हा पीएफआयच्या ‘हिट स्क्वॉड’ चा सदस्य होता आणि २०२१ मध्ये लखनौमध्ये सुधारित स्फोटक यंत्रांसह पकडले गेलेले अन्शद बद्रुद्दीन आणि फिरोज खान यांचे मार्गदर्शक होते.

हेही वाचा..

हेमंत सोरेन यांच्या वहिनी सीता सोरेन भाजपात!

‘घड्याळ’ अजित पवारांकडे तर शरद पवार गटाला ‘तुतारी वाजविणारा माणूस

चकमक फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला जन्मठेप

पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवणाऱ्या राज ठाकरेंचे स्वागत!

२४ आणि २५ फेब्रुवारी रोजी भारताची राजधानी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदूविरोधी दंगली घडल्या. या दंगलींमध्ये ५३ लोकांचा मृत्यू झाला तर २०० हून अधिक लोक जखमी झाले होते.जन्मभूमी अहवालात म्हटले आहे की, फेब्रुवारी २०२० मध्ये राष्ट्रीय राजधानीत हिंदुविरोधी दंगली उसळल्यानंतर इस्लामवादी आणि बंदी घातलेल्या पीएफआयचे सदस्य त्यांच्या योजनेनुसार निरपराध हिंदूंना मारत होते. इस्लामी जमावाने दाखवलेल्या रस्त्यावरील हिंसाचाराचे नियोजन आणि भयंकर प्रदर्शनामुळे दिल्ली पोलीस देखील संतापले होते. ज्या वेळी असंख्य हिंदू या हिंसाचाराला बळी पडत होते, त्या वेळी भाजप नेते कपिल मिश्रा आणि परवेश वर्मा यांनी या इस्लामवाद्यांना मागे ढकलण्यासाठी हरियाणातील जाट आणि गुज्जर सैन्याचे नेतृत्व केले. दिल्ली पोलिसांना जे जमले नाही ते जाट आणि गुज्जरांनी केले. यामुळे संतप्त झालेल्या बदरुद्दीन आणि फिरोज खान यांना पीएफआय बंडखोरीचा कट उधळून लावणाऱ्या भाजप नेत्यांच्या हत्येची योजना आखण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार ते दोघेही कप्पनसह दिल्लीत आले आणि राजधानी दिल्लीतील नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्युमन राइट्स ऑर्गनायझेशन कार्यालयात एकत्र राहिले.

दरम्यान, ऑक्टोबर २०२० मध्ये जेव्हा दिल्लीत गेल्या सात दशकांतील सर्वात भीषण हिंसाचाराचा धक्का आणि संतापाचा धक्का बसला होता, तेव्हा हातरसची घटना घडली. सिद्दीक कप्पन आणि पीएफआय आणि कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियाच्या इतर सदस्यांसह एका गाडीतून हातरसला निघाले, तर अन्शद बद्रुद्दीन आणि फिरोज खान यांना दुसऱ्या कारमध्ये त्यांना नेमून दिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी पाठवले. तथापि, हातरसला जात असताना ५ ऑक्टोबर २०२० रोजी कप्पनला अटक करण्यात आली. कप्पनच्या अटकेची माहिती मिळाल्यावर घाबरलेल्या बदरुद्दीन आणि फिरोज खान यांनी दिल्ली गाठली. चार महिन्यांनंतर, फेब्रुवारी २०२१ मध्ये बद्रुद्दीन आणि फिरोज खान, लखनौ आणि यूपीच्या इतर भागांमध्ये अनेक बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी स्फोटके आणि बंदुकांसह लखनौला गेले. तिथे त्यांना यूपीच्या दहशतवाद विरोधी पथकाने पकडले.

 

Exit mobile version