बाळासाहेबांची इच्छा नव्हती, परंतु उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली !

मुखमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप

बाळासाहेबांची इच्छा नव्हती, परंतु उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली !

बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून राज ठाकरे यांनी बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन केला. राज ठाकरे यांच्या बाहेर पडल्याने अनेकांनी वेगवेगळे दावे केले होते. तसेच माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नसून त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या बडव्यांशी आहे, असे स्वतः राज ठाकरे म्हणाले होते. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्याचा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज ठाकरेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. पण त्यांच्याकडे जबाबदारी देण्याची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरेंच्या मनात लालसा निर्माण झाली, जशी की आता मुख्यमंत्री बनण्याची लालसा निर्माण झाली होती. त्यानंतर राज ठाकरे यांना बाजूला सारण्यात आले.

हे ही वाचा :

ममता बॅनर्जींना शिवीगाळ करणाऱ्यांची ‘बोटे तोडा’

धक्कादायक! अग्नीविराचा ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, ५० लाखांचे दागिने केले फस्त !

नाशिकमध्ये दोन महिलांसह तीन बांग्लादेशींना अटक !

बांगलादेशातील हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात बोरिवलीत जनआक्रोश

 

ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी काहींना हाताशी धरून स्वतःला कार्याध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव आणला. त्यानंतर राज ठाकरेंना हटवण्यात आले. हटवण्यात आल्यानंतरही राज ठाकरे म्हणाले की, ज्या ठिकाणी शिवसेना कमकुवत आहे, तेथील जबाबदारी मी घेतो. परंतु, ती देखील जबाबदारी त्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे राज ठाकरेंना शिवसेनेतून बाहेर पडावे लागले. राज ठाकरेंनी पक्षातून बाहेर जावं अशी मुळीच इच्छा बाळासाहेबांची नव्हती, असे मुख्यमंत्री शिंदेनी सांगितले.

Exit mobile version