कर्नाटकची राजधाना बेंगळुरू येथे सध्या पुराने हाहाकार केला असून माहिती तंत्रज्ञानासाठी ओळखल्या जाणाऱ्या या शहराला पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टरवरून ऑफिस गाठण्यास प्राधान्य दिल्याच्या बातमीची सर्वत्र चर्चा आहे. पाणी भरलेल्या रस्त्यांवरून ट्रॅक्टरने प्रवास करणे सोयीचे असल्यामुळे सध्या सर्वच कर्मचाऱ्यांनी हा मार्ग पत्करला आहे.
मुसळधार पावसामुळे बेंगळुरू अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांनी कार्यालय गाठण्यासाठी ट्रॅक्टरचा मार्ग पत्करला आहे. येमालुर येथे राहणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टरचा मार्ग अवलंबिला आहे. महत्त्वाचे म्हणजे या ट्रॅक्टर प्रवासासाठी माणशी ५० रुपये घेतले जात असल्यामुळे कर्मचाऱ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे.
#WATCH | Karnataka: Locals in Bengaluru continue to bear the brunt of severe waterlogging as water is yet to recede from roads & bylanes after yesterday's downpour pic.twitter.com/luIBbOHHwe
— ANI (@ANI) September 6, 2022
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी यासंदर्भात आयटी कंपन्यांशी चर्चा करणार असून पाणी तुंबल्यामुळे २२५ कोटींचे नुकसान झाल्यासंदर्भातही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, असे ते म्हणाले आहेत. शिवाय, झालेल्या नुकसानीची भरपाई कशी करता येईल, यासंदर्भातही सूचना आम्ही घेऊ, असेही त्यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
ब्रिटनकडून ‘लगान’ वसूल करण्याची वेळ
‘या’ दिवशी ७५ रुपयांत बघा कुठलाही सिनेमा
१४ हजार ५०० शाळांसाठी ‘पीएम श्री स्कुल्स’ स्मार्ट योजनेची घोषणा
ठाण्यात स्लॅब कोसळून घरातील दोघे जखमी
बेंगळुरूत सध्या पडत असलेला मुसळधार पावसामुळे इमारतींमध्येही पाणी शिरले आहे. तिथे असलेल्या पार्किंगच्या जागाही पाण्याने वेढल्या असून पार्क केलेल्या गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. त्यावर बोम्मई म्हणाले की, यावर्षी प्रचंड पाऊस झालेला आहे. त्यामुळे तळघरात असलेली दुकाने व कार्यालये यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. आम्ही हे पाणी पंपाच्या सहाय्याने बाहेर काढण्यास सुरुवात केलेली आहे.
एका मुलीचा गटारात पडून मृत्यू झाल्याची घटनाही बेंगळुरूत घडल्यामुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यावर बोम्मई म्हणाले की, रस्ते बनविण्यात आले तेव्हा सांडपाण्याचा निचरा कसा करता येईल याचा विचार झाला नाही. त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो आहे.
View of one of the super premium properties in Bangalore. pic.twitter.com/npZceG5NeF
— Rohit Varma (@rohitvaarma) September 5, 2022