25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषबंधुभावानेच त्यांच्यातील दुर्दम्य आशावाद टिकवला

बंधुभावानेच त्यांच्यातील दुर्दम्य आशावाद टिकवला

Google News Follow

Related

११ नोव्हेंबर रोजी आठ वाजता या ४१ श्रमिकांनी एका बंधुभावाच्या नात्याने रात्रभर काम करण्याच्या उद्देशाने या बोगद्यात प्रवेश केला. जेव्हा ते सकाळी बाहेर पडतील, तेव्हा दिवाळीचे स्वागत मोठ्या उत्साहात करतील, असा त्यांचा उद्देश होता. परंतु पहाटे साडेपाच वाजता अघटित घडले. बोगद्याचा भाग कोसळला आणि हे सर्व ४१ कामगार आत अडकून बसले. सुरुवातीला ते घाबरले, मात्र नंतर त्यांनी बोगद्यातच एके ठिकाणी सुरक्षित आश्रय शोधला.

‘जेव्हा आम्हाला समजले की आम्ही अडकलो आहोत, तेव्हा आम्ही खूप घाबरलो. आमच्या मनात केवळ आमच्या कुटुंबाचा आणि मुलांचा विचार तरळला,’ असे विश्वेश्वर नायक यांनी सांगितले. पुढील १७ दिवस नायक आणि अन्य ४० श्रमिकांसाठी सिल्क्यारा बोगद्यातील तो दोन किमीचा भागच या सर्वांचे घर बनले होते. तेच एकमेकांचे आधार बनले होते. त्यांचा धीर कधी खचत होता, तर मध्येच त्यांच्यात आशेचे अंकुर फुटायचे. पुन्हा त्यांचे मन निराशेने काळंवडायचे. मात्र ते एकत्र राहात होते. अखेर २९ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेआठ वाजता त्यांच्या घरी खरोखरची दिवाळी साजरी झाली. एकेक करून हे सर्व जण बोगद्यातून सुखरूप बाहेर पडले आणि सगळीकडे आनंदोत्सव साजरा झाला.

ओदिशातील ४० वर्षीय विश्वेशर यादव गेली साडेचार वर्षे हिमालयाच्या खोऱ्यात बोगदा खणण्याचे काम करत आहेत. जेव्हा १२ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता बोगद्याचा एक भाग पडला, तेव्हा इथून बाहेर पडू शकू, हा विश्वास पहिल्यांदा व्यक्त करणारे तेच होते. ‘मी उत्तराखंडमध्ये असल्यापासून चार भूकंप बघितले आहेत. मात्र अशा प्रकारचा अनुभव कधी आला नव्हता. बोगद्याचा एकेक भाग ढासळतच होता. दगड निखळतच होते. सकाळी आठ वाजता राडारोड्याचा थर ७० मीटर जाड झाला होता, असे नायक यांनी सांगितले. त्यांनी लगेचच किती श्रमिक आहेत, ते मोजले. ‘दगड निखळायचे थांबले होते. सगळीकडे भयाण शांतता पसरली होती. त्यातील चार जणांकडे फोन होते. पण बोगद्यात आतमध्ये नेटवर्कच नव्हते. त्यांच्याकडचे वॉकीटॉकी हँडसेट्सही चालत नव्हते. त्यामुळे पुढचे चार तास आमच्यासाठी खूप अवघड गेल्याचे, रोहतास येथील सुनील कुमार विश्वकर्मा सांगतात.

त्यांच्यासमोर पहिले काम होते, ते बाहेरच्यांशी संपर्क साधून त्यात ते अडकले असून जिवंत असल्याचे कळवणे. या बोगद्यात बाहेरच्या दिशेने जाणारे तीन ते चार इंचाचे दोन पाइप आधीच बसवण्यात आले होते. मशिन थंड करण्यासाठी पाणी वाहून नेण्यासाठी तसेच, खडकांवरून ओघळणारे पाणी बाहेर फेकून देण्यासाठी याचा वापर केला जात असे. मात्र ते अडकले होते, हे बाहेरच्या इंजिनीअरना कळवण्यासाठी पाइपमधून प्रत्येक पाच मिनिटांनी पाणी फेकण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर इंजिनीअरनी याच पाइपच्या माध्यमातून अडकलेल्या श्रमिकांशी संवाद साधला. हाच चार इंचाचा पाइप त्यांची जीवनवाहिनी ठरली. पहिले दोन दिवस त्यांना याच पाइपमधून ऑक्सिजन, अन्नपदार्थांची पाकिटे मिळाली. त्यात काजू, पोहे होते. मात्र त्यातले फारच कमी पदार्थ घशाखाली उतरत. १२ आणि १३ नोव्हेंबरला कोणीच काही खाल्ले नाही. मात्र त्यानंतर सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण हे पोहेच असायचे. जेव्हा पदार्थ येत नसत तेव्हा पाइपमधून ऑक्सिजन येई. अर्थात एक व्यक्ती दररोज तेच तेच अन्नपदार्थ खाऊ शकत नाही. त्यामुळे आताही दोन ते तीन किलो सुका मेवा बोगद्यातच असेल, असे बिहारच्या ३४ वर्षीय साबा अहमद यांनी सांगितले.

मनोरंजनासाठी खेळ

मनोरंजनासाठी ते राजा, राणी, चोर, शिपाई असे खेळ खेळत असत. आम्ही वाजले किती हेच बघायला आमचा फोन सुरू करत असू, असे सुनील कुमार विश्वकर्मा सांगतात. मात्र त्यानंतर सहा इंच पाइप टाकण्यात आला आणि श्रमिकांना शिजवलेले अन्नपदार्थ, पाणी आणि मोबाइल फोन चार्जर व एन्डोस्कोपिक कॅमेरा बोगद्यात देण्यात आला. त्यामुळे हे सर्व श्रमिक जिवंत असल्याचे संपूर्ण जगाला समजले. काही जण तर सकाळी दोन किमीच्या अंतरावर मॉर्निंग वॉकलाही जात. आम्ही सर्वांना योग करण्यासही प्रोत्साहन देत होतो. त्यानंतर या सहा इंच पाइपमधून खिचडी, पाव, अंडी आणि फळेही मिळू लागली आणि या श्रमिकांचा आत्मविश्वास दुणावला. लवकरच इंजिनीअरनी या बोगद्यातून सुटकेचा मार्ग शोधला आणि या श्रमिकांची सुटका झाली.

हे ही वाचा:

टाटा टेक्नॉलॉजीची दणक्यात लिस्टिंग; गुंतवणूकदारांनी एका शेअरवर जवळपास ७०० रुपये कमावले

फेसबुक लाईव्हवरून काम करणाऱ्यांनी माझ्यासारख्या मुख्यमंत्री कार्यकर्त्याला शिकवू नये!

मणिपूरातील बंडखोर गट ‘यूएनएलएफने’ शांतता करारावर केली स्वाक्षरी!

पक्ष प्रमुखच नाहीत, तर पक्षादेश कुठला?

शौचासाठी खणले खड्डे

बोगद्यात पोकलेन मिशन होते. या मशिनने त्यांनी बोगद्याच्या एका लांब कोपऱ्यात ५० ते ६० खड्डे खणले. हे श्रमिक त्यात शौच करून आल्यानंतर हे खड्डे मातीने बुजवले जायचे, असे अहमद यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा