२५ वर्षे एकत्रित राहिलेली भाजप आणि उध्वव ठाकरेंची सेना एकमेकांच्या विरोधात आहे. विधानसभेत महायुतीला मोठे यश मिळाल्यानंतर विरोधी पक्षातील अनेक बडे नेते, कार्यकर्ते महायुतीमध्ये सामील होत आहेत. उद्धव ठाकरे आणि भाजपा एकत्रित येण्याच्या बातम्याही पुन्हा समोर येत आहेत. अशातच भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीमुळे अशा बातम्यांना वाव मिळाला आहे. त्यामुळे या भेटीवरून भाजपा आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्रित येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री फडणवीसांनी अशा चर्चांना पूर्ण विराम देत चंद्रकात पाटील आणि ठाकरेंच्या भेटीवर मार्मिक उत्तर दिले आहे.
मुंबईतील एका लग्न सोहळ्यात चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. यावेळी ठाकरेंच्या सोबत असणारे मिलिंद नार्वेकर यांनी हसत हसत चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला, युती कधी होणार?. यावर चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देताना म्हटले, मीही त्याच सुवर्ण क्षणाची वात पाहत आहे. यावेळी दोनही नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
हे ही वाचा :
महाकुंभ: मिलिंद सोमणचे सपत्नीक संगमात स्नान, म्हणाला ‘धन्य’ वाटले!
राजधानीत मराठी साहित्य संमेलन ही अभिमानाची गोष्ट!
बसपा नेते रज्जुमाजरा हत्याकांडातील आरोपी चकमकीत ठार!
तेव्हा चप्पल सोडली आज ठाकरेंनाही सोडलं!
या दोघांच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर मार्मिक उत्तर देताना ते म्हणाले, लग्नात भेटणे हे स्वाभाविक आहे. मी तिथे असतो तर माझीही उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट झाली असती. त्यात फार काही विशेष नाही. पहिली गोष्ट तर लग्नात भेटल्यामुळे पक्ष जवळ येतात, युती होते इतका भाबडा विचार हा तुमच्या सारख्या जेष्ठ पत्रकारांच्या डोक्यात येवू नये अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे.