पाकिस्तान देश अनेक काळापासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे.दिवसेंदिवस पाकिस्तानची परिस्थिती आणखी बिघडत चालली आहे.महागाईमुळे पाकिस्तानचे नागरिक बेहाल झाले आहेत.सलग दुसऱ्या आठवड्यात देखील पाकिस्तान देशाचा महागाई दर ४० टक्क्यांच्या वर कायम आहे. पाकिस्तानमध्ये गॅसच्या वाढत्या किमतींमुळे देशात महागाईत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे,असे पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिले आहे.या वाढलेल्या महागाईमुळे खाण्यापिण्याच्या सर्व गोष्टींमध्ये वाढ झाली आहे.
पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २३ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशातील महागाई दर ४१.१३ टक्के नोंदवला गेला. गेल्या वर्षभरात देशातील गॅसच्या किमती १,१०० रुपयांनी वाढल्या आहेत. पाकिस्तानमध्ये गॅसशिवाय खाद्यपदार्थांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. देशात पिठाच्या किंमतीत ८८.२ टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे. याशिवाय बासमती तांदूळ ७६.६ टक्के, तांदूळ ६२.३ टक्के, चहाची पाने ५३ टक्के, लाल तिखट ८१.७० टक्के, गूळ ५०.८ टक्के आणि बटाटे ४७.९ टक्के महागले आहेत. गेल्या वर्षभरात देशात कांद्याचे दर ३६.२ टक्के, टोमॅटो १८.१ टक्के, मोहरीचे ४ टक्के आणि वनस्पती तेलाचे भाव २.९० टक्क्यांनी वाढ झालीआहेत.
हे ही वाचा:
पाकिस्तानमध्ये पुन्हा एक हिंदू मंदिर उद्ध्वस्त!
कोची विद्यापीठातील कॉन्सर्टमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू!
तोंडावर मुक्का मारल्याने पतीचा मृत्यू!
दुसऱ्या टप्प्यात १३ इस्रायली, १४ थायलंडचे नागरिक रेड क्रॉसला सुपूर्द!
देशातील अल्पकालीन चलनवाढ, ज्याला सेन्सिटिव्ह प्राइस इंडिकेटर (SPI) म्हटले जाते, गेल्या एका आठवड्यात १० टक्क्यांनी झेप घेतली आहे. ती वाढ ३०८. ९० च्या तुलनेत ३०९.०९ टक्क्यांवर पोहोचली आहे. हा डेटा पाकिस्तानच्या १७ प्रमुख शहरांतील ५० बाजारांतील ५१ जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींचा समावेश करून तयार केला आहे. पीबीएसच्या म्हणण्यानुसार, देशात १८ जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत, तर १२ वस्तूंच्या किमती स्वस्त झाल्या आहेत आणि २१ वस्तूंच्या किमती जुन्याच पातळीवर राहिल्या आहेत.