30 C
Mumbai
Monday, December 2, 2024
घरविशेषआदिपुरुषची घसरण थांबता थांबेना!

आदिपुरुषची घसरण थांबता थांबेना!

६०० कोटींचा खर्च वसूल करणे होणार कठीण

Google News Follow

Related

दणक्यात प्रदर्शित झालेल्या “आदिपुरुष” चित्रपटाची टायटॅनिक जहाजासारखी बुडण्याच्या दिशेने वाटचाल…
गेल्या शुक्रवारी प्रदर्शित होऊन दणदणीत गती पकडलेला दिगरदर्शक ओम राऊत यांचा “आदिपुरुष” हा सिनेमा लगेच वादांच्या भोवऱ्यात सापडला. सोमवार सकाळपासून या चित्रपटाने गटांगळ्या खायला सुरुवात केली आणि बुधवार (२१ जून) रात्री पर्यंत या चित्रपटाने टायटॅनिक जहाजासारखी बुडण्याकडे वाटचाल सुरु केली आहे, असे चित्रपट समीक्षकांचे प्राथमिक निरीक्षण आहे.

 

हा भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे आणि काहींनी असा दावा केला आहे की हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट प्रकल्प आहे. पण दुर्दैवाने, बॉक्स ऑफिसकडे गेल्या ३ दिवसांपासून रसिक प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यामुळे चित्रपट निर्मात्यांपुढे खूप मोठे आर्थिक संकट आ वासून उभे ठाकले आहे, असे चित्र दिसत आहे.

 

ओम राऊत यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट पहिल्या दिवसापासून वादांच्या भोवऱ्यात अडकला आहे. सुमार दर्जाच्या VFX चा अतिरंजित वापर, आक्षेपार्ह आणि थिल्लर संवाद, कंटाळवाणी पटकथा आणि रामायणाचे खूप जास्त आणि अनावश्यक ‘आधुनिकीकरण’ हे काही घटक आहेत ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये गोंधळ होतो. परिणामी, चित्रपट तिकीट खिडक्यांवर पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळू लागला आहे.

 

ताज्या अपडेटनुसार, आदिपुरुषने भारतीय बॉक्स ऑफिसवर २५५ कोटींची कमाई केली आहे, जी ३०० कोटी कमाईच्या बरोबरीची आहे. परदेशात, चित्रपटाने मोठी निराशा केली आहे आणि आतापर्यंत केवळ ४८ कोटींची कमाई केली आहे. ६ दिवसांनंतर जगभरातील एकूण ३४८.९०कोटींची कमाई झाली आहे.

 

हे ही वाचा:

‘मातोश्री’जवळील ठाकरे गटाच्या शाखेवर पालिकेचा बुलडोझर

…आणि अमूल गर्ल पोरकी झाली!

अजित पवार बाटली का फिरवत होते कळलं का?

 

मात्र चित्रपट व्यवसायातील तज्ञ व्यक्तींच्या म्हणण्यानुसार आदिपुरुषला ना नफा ना तोटा अवस्थेत येण्यासाठी किमान ६०० कोटींची कमाई करणे आवश्यक आहे. पण चित्रपटाची सध्याची अवस्था पाहता हे जवळपास अशक्य आहे. कारण चालू आठवडा संपताना चित्रपटाचे एकूण सर्व चित्रपटगृहातील उत्पन्न हे ४०० कोटींपेक्षा जास्त होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे सध्याच्या एकूण ३४८.९० कोटींच्या कलेक्शनच्या तुलनेत, हा एवढा मोठा महागडा चित्रपट अजूनही २५१.१० कोटींच्या कमाई पासून बराच दूर आहे. भारताबद्दलच बोलायचे झाले तर, सर्व भाषांचे मिळून ब्रेकईव्हन ३२० कोटी आहे आणि त्या संख्येपर्यंत पोहोचणे सध्या तरी ओम राऊतांच्या या चित्रपटाला खूप कठीण आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
204,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा