बोरिवली येथील स्वामी विवकानंद मार्गावरील उड्डाण पुलाच्या बांधकामाचा खर्चावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. स्थायी समितीच्या पटलावर या पुलाच्या वाढीव खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. त्यामुळे आता हा प्रस्ताव पुन्हा एकदा मंजुरीसाठी स्थायी समितीकडे आल्यामुळे भाजपच्या मागणीवरून हा प्रस्ताव आता राखून ठेवण्यात आलेला आहे. यावर आता पुढील आठवड्यात काय तो निर्णय होणार आहे.
श्रीखंडे कन्सल्टंट आणि टीपीएफ हे या कामाचे सल्लागार असून पहिल्या ५० कोटीच्या कामासाठी सल्लागार मानधन म्हणून साडेपाच कोटी रुपये देण्यात येणार आहेत. निविदा न मागवताच पालिकेने त्याच कंत्राटदाराला काम देण्याचे ठरवले. त्यामुळेच १६१ कोटींवरून तब्बल ६५१ कोटी हा खर्च गेलेला आहे. म्हणजेच ३०० कोटींची वाढ यामध्ये झालेली आहे.
सदर पुलाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर आयएस कोडमध्ये नवीन सुधारणा लागू झाल्या. पुलाच्या सुरक्षेसाठी बेअरिंगमध्ये सुधारणा करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे सल्लागार टीपीएफ इंजिनीअरिंग यांच्याशी चर्चा करून बेअरिंग अद्ययावत करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच काही ठिकाणी पुलाच्या लांबीत वाढ करणे आवश्यक झाल्याने बांधकाम खर्चात वाढ झाली आहे, असे पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
अरेरे! नवरा गेला, चिमुरड्यांचीही तिने केली हत्या
मध्य रेल्वेने केला ऑलिम्पियन महिला हॉकीपटूंचा गौरव
मध्य रेल्वेने केला ऑलिम्पियन महिला हॉकीपटूंचा गौरव
बोरिवली पूर्व पश्चिम जोडणारा जनरल करिअप्पा पूल ते पश्चिम द्रुतगती महामार्ग यांना जोडणाऱ्या विकास नियोजन रस्त्यावर सुमारे १३५ मीटर अंतरात बांधकामे करण्यात आलेली आहेत. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून करिअप्पा उड्डाणपुलाचा पूर्वेकडील उतार ते पश्चिम दृतगती मार्गापर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम पुढे वाढवण्यात येणार आहे. आता या पुलासंदर्भात पुढील आठवड्यातील बैठकीमध्ये काय निर्णय होणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.