इस्रोचे पुढील लक्ष्य ‘आदित्य -एल १’

मोहीमेचा २ सप्टेंबरला होणार प्रारंभ

इस्रोचे पुढील लक्ष्य ‘आदित्य -एल १’

चंद्राच्या दक्षिण धृवावर उतरून ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर आता इस्रो सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य-एल१’ मोहिमेला प्रारंभ करणार आहे. ही मोहीम २ सप्टेंबरला सुरू होईल.

‘आदित्य-एल१’ मोहीम ही सुरू होण्यासाठी सुसज्ज आहे, असे इस्रोच्या अहमदाबाद येथील केंद्राचे संचालक नीलेश देसाई यांनी सांगितले. हे यान श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून इस्रोच्या पीएसएलव्ही रॉकेटच्या माध्यमातून प्रयारण करेल. या यानाला नियोजित स्थळी पोहोचण्यासाठी १२७ दिवसांचा कालावधी लागणार आहे. हे नियोजित स्थळ पृथ्वीपासून १५ लाख किमी अंतरावर आहे.

हे रॉकेट आदित्य-एल १ ला उच्च लंबवर्तुळाकार कक्षेत ठेवेल, ज्यामुळे ते सूर्याचे जवळून निरीक्षण करू शकेल, तसेच, सौर प्रक्रियांचे निरीक्षण करू शकेल आणि पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवणाऱ्या या ताऱ्याबद्दलचे आपले ज्ञान वृद्धिंगत करेल. आदित्य-एल१ मोहीम शतकानुशतके वैज्ञानिक आणि अवकाशप्रेमींना भुरळ घालणाऱ्या सूर्याचा शोध घेण्याचा भारताचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न असेल.हे अंतराळयान दृश्यमान उत्सर्जन रेषा कोरोनग्राफने सुसज्ज असेल, ज्याचा उपयोग सूर्याच्या इमेजिंग आणि स्पेक्ट्रोस्कोपीसाठी केला जाईल. हे अंतराळ यान इतर सहा उपकरणांनीही सुसज्ज असेल, त्यागो ते सूर्याच्या विज्ञानाचा शोध घेईल. आदित्य एल १ मोहिमेसाठी ३७८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या अंतराळयानाचा कालावधी पाच वर्षे असेल.

हे ही वाचा:

‘इंडिया’ आघाडी भाजपला पराभूत करेल?

शरद पवार, सुप्रिया सुळे लवकरच मोदी सरकारला पाठिंबा देतील

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक; २० मिनिटांसाठी होते तुरुंगात

… म्हणून जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवले

सूर्याच्या वातावरणाचा आणि ‘क्रोमोस्फिअर’चा अभ्यास करणे, सूर्यावरील घडामोडींमुळे वातावरणात निर्माण होणारी उष्णता, आयोनाइज्ड प्लाझ्मा आणि ज्वालांची निरीक्षणे टिपणे, सूर्यावरील उष्णात निर्माण होण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास करणे, त्याच्याशी संबंधित चुंबकीय शक्तीविषयी निरीक्षणे नोंदविणे, सौरवादळे आणि सौरस्फोट यांतून निर्माण होणाऱ्या ज्वालांच्या प्रक्रियांचे संशोधन करणे, अवकाशातील वातावरणावर परिणाम करणाऱ्या सौर वाऱ्यांचा उगम, त्यातील घटक आणि अन्य घडामोडींचा अभ्यास करणे, ही ‘आदित्य एल १’ मोहिमेची उद्दिष्ट्ये आहेत.

Exit mobile version