इस्रोच हाताळणार राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत अवकाशीय प्रकल्प

इस्रोच हाताळणार राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत अवकाशीय प्रकल्प

राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत सर्व अवकाशीय प्रकल्पांची हाताळणी इस्रो तर्फेच केली जाणार असल्याचे सरकारतर्फे राज्यसभेत स्पष्ट करण्यात आले. चांद्रयान २, गगनयान यांसारख्या राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाचे प्रकल्पांची धुरा इस्रोच्याच खांद्यावर राहणार आहे.

हे ही वाचा:

भारताच्या लसीकरण मोहिमेतील मोठी झेप

संसदेच्या राज्यसभा सदस्य जयराम रमेश यांच्या नेतृत्वाखालील विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील स्थायी समितीने उपस्थितीत केलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना हे स्पष्टीकरण देण्यात आले होते. या समितीने नव्याने स्थापन करण्यात आलेली न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआयएल) ही कंपनी इस्रोची जागा घेणार का? असा सवाल केला होता.

एनएसआयएल या संस्थेने नुकताच ऍमॅझॉनिया हा उपग्रह तयार केला होता. या उपग्रहाचे प्रक्षेपण इस्रोद्वारे इतर १८ उपग्रहांच्या सोबत करण्यात आले होते. २८ फेब्रुवारी रोजी हे प्रक्षेपण केले गेले.

इस्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या अंतरिक्ष कॉर्पोरेशनद्वारे काही व्यावसायिक कामे पाहिली जात होती. मात्र त्यानंतर अंतरिक्ष कॉर्पोरेशन आणि अमेरिका स्थित ‘देवास मल्टिमिडीया’ कंपनी यांच्यात काही कायदेशीर विवाद उद्भवला. त्याचा फटका बसू नये यासाठी, आता एनएसआयएलची स्थापना देखील समान उद्देशाने करण्यात आली आहे. परंतु तरीही अवकाश क्षेत्रात राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्न इस्रोद्वारेच हाताळले जाण्याची ग्वाही सरकारकडून देण्यात आली.

Exit mobile version