इस्रोकडून नव्या उपग्रहाचे प्रक्षेपण

इस्रोकडून नव्या उपग्रहाचे प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) नव्या उपग्रहाच्या प्रक्षेपणाच्या तयारीत आहे. भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपणाची दिनांक, वेळ आणि स्थान देखील इस्रोकडून सुनिश्चित करण्यात आले आहे. याबाबत इस्रोने त्यांच्या संकेतस्थळावर शिवाय ट्वीटरवर माहिती दिली आहे.

भूस्थिर उपग्रह इओएस-०३ या उपग्रहाचे प्रक्षेपण इस्रो करणार आहे. त्यासाठी श्रीहरीकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटरमधील दुसऱ्या लाँचपॅडचा वापर करण्यात येणार आहे. जीसॅट-१ हा उपग्रह वाहून नेण्यासाठी जीएसएलव्ही-एफ१० या मोहिमेची आखणी करण्यात आली आहे. जर वातावरणाने साथ दिली तर १२ ऑगस्ट २०२१ रोजी पहाटे ५ वाजून ४३ मिनिटांनी जीएसएलव्ही उड्डाण करणार आहे. इस्रोने ट्वीटरवरून याची माहिती दिली आहे.

हे ही वाचा:

काय ठरलं राज ठाकरे चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत?

‘संसदेचं अधिवेशन चालू द्या’ म्हणत ‘या’ खासदाराचं आंदोलन

हिंदुत्वाबद्दल मनसे नेते नांदगावकर म्हणाले…

आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

या उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर हा पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित केला जाईल. हा उपग्रह पृथ्वीवर दूरवरून पृथ्वीच्या वेगाने तिच्या भोवती फिरत लक्ष ठेवून राहणार आहे. भूस्थिर प्रकारच्या उपग्रहाचा वापर जमिनीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी होतो.

भूस्थिर उपग्रह हा दळणवळण, संदेशवहन इत्यादी कामांसाठी अतिशय उपयुक्त ठरतो. त्याशिवाय या उपग्रहाचा वापर मोठ्या भूप्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी देखील केला जातो. त्यामुळे अनेक नैसर्गिक आपदा, ठराविक वेळी घडणारे प्रसंग यांबरोबरच शेती, जंगल उत्पादने, खाणकाम अशा विविध क्षेत्रांमथ्ये देखील या उपग्रहाचा वापर केला जाऊ शकतो.

या उपग्रहाचे प्रक्षेपण खरेतर ५ मार्च २०२० रोजी होणार होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे इस्रोने हे प्रक्षेपण पुढे ढकलले होते.

Exit mobile version