इस्रोचे लक्ष चंद्राच्या कक्षेतील ‘ट्रॅफिक’कडे

आता केवळ १५ दिवस शिल्लक राहिले

इस्रोचे लक्ष चंद्राच्या कक्षेतील ‘ट्रॅफिक’कडे

चांद्रयान-३मधून विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर स्थानापन्न करण्यासाठी आता केवळ १५ दिवस शिल्लक राहिले आहेत. हे लक्ष्य साधण्यासाठी इस्रोचे लक्ष लागून राहिले ते चंद्राच्या कक्षेत फिरणाऱ्या इतर उपग्रहांच्या गर्दीकडे. या गर्दीतून इस्रोला लँडर सुरक्षितपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवायचे आहे. अर्थाक इस्रोला त्यांच्या भविष्यातील मोहिमांसाठीही पुढील काही वर्षे या ‘ट्रॅफिक’कडे लक्ष द्यावे लागणार आहे.

 

अवकाशातील ‘ट्रॅफिक’ नियंत्रित करणे, ही सतत चालणारी प्रक्रिया असते. याआधी सन २०१९मध्ये चांद्रयान-२ चंद्राच्या कक्षेत प्रवेश करत असताना चांद्रयानाची तीनवेळा दुसऱ्या अंतराळयानाची धडक होता होता वाचली, ती इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या सतर्कतेमुळेच. त्यामुळे आताही त्यांना ही काळजी घ्यावी लागणार आहे.

 

अंतराळात यान पाठवणे, उपग्रह पाठवणे ही बाब आता आव्हानात्मक ठरली आहे. गेल्या काही वर्षांत अंतराळ संशोधनात सक्षम असणाऱ्या देशांनी अनेक अंतराळमोहिमा आखल्या आहेत. त्यामध्ये सौरमालेचा अभ्यास, छोट्या-मोठ्या ग्रहांचा, उपग्रहांचा अभ्यास आदी मोहिमांचा समावेश आहे. त्यातही चंद्र आणि मंगळाचा अभ्यास करण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. त्यामुळे साहजिकच या दोन ग्रहांभोवती सध्या अनेक यानांची गर्दी आहे आणि चंद्राबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी या भागांत भविष्यात आणखी गर्दी वाढणार आहे, असे इस्रोने सांगितले.

हे ही वाचा:

भारतातील किशोरवयीन मुलांना शोषणास प्रवृत्त करणाऱ्याला १२ वर्षे तुरुंगवास

भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठरविणाऱ्या इक्वेडॉर अध्यक्षपदाच्या उमेदवाराची गोळी झाडून हत्या

विश्वचषक स्पर्धेच्या तयारीदरम्यान ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये आग

पाकिस्तानची संसद बरखास्त; पंतप्रधान शहबाज शरीफ सरकारचा कार्यकाळही संपुष्टात

याआधी या मोहिमा ग्रहांचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी आखल्या जात असत, मात्र आता या मोहिमांचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जात आहे. विशेषत: त्याचा व्यावसायिकदृष्ट्या वापर केला जात असल्याने या दोन्ही ग्रहांचे आकर्षण वाढू लागले आहे आणि त्याभोवताली असलेली गर्दीही. त्यामुळे या गर्दीतून वाट काढून आपले लक्ष्य साधण्यासाठी सदैव सतर्क राहावे लागते.

 

अंतराळयानातील कचऱ्याची डोकेदुखी

सध्‍या अंतराळातील वाढत्या कचऱ्यामुळे पृथ्‍वी कक्षेतील तसेच, चंद्राच्या कक्षेतील अवकाशात फिरणारे उपग्रह आणि यानांना दीर्घकालीन धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यातील मोहिमा आखताना याचा अभ्यास करणे गरजेचे झाले आहे.

Exit mobile version