”चांद्रयान-३” १३ जुलैला अवकाशात झेपावणार

'चांद्रयान-२' मोहिमेच्या तुलनेत 'चांद्रयान-३' मध्ये अनेक बदल

”चांद्रयान-३” १३ जुलैला अवकाशात झेपावणार

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने बुधवारी भारताची तिसरी चंद्र मोहीम ”चांद्रयान-३” च्या प्रक्षेपणाची घोषणा केली आहे. ‘चांद्रयान -३’ चे प्रक्षेपण १३ जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. या मोहिमेद्वारे एक रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवला जाणार आहे. १३ जुलैला दुपारी २:३० वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण केले जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले. या अंतराळयानामध्ये स्वदेशी लँडर मॉड्यूल (LM), एक प्रोपल्शन मॉड्यूल (PM) आणि आंतरग्रहीय मोहिमांसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान विकसित आणि प्रदर्शित करण्यासाठी रोव्हर आहे.तथापि, भारतीय अंतराळ संशोधन (ISRO) संस्थेचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी चांद्रयान -३ च्या प्रक्षेपणाच्या तारखेबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसून आपण १२ ते १९ जुलै दरम्यानच्या तारखेचा विचार करत आहोत असे स्पष्ट केले आहे.

भारतीय हवाई दलाच्या एका कार्यक्रमांमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. १३ जुलै च्या प्रक्षेपणाच्या तारखे बद्दलच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, आतापर्यंत १२ ते १९ जुलै दरम्यानच्या तारखेचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तांत्रिक समस्या उद्भवल्या नाहीत तर ती तारीख १२, १३ किंवा १४ जुलै असू शकते किंवा शेवटपर्यंत १९ जुलैपर्यंत जाऊ शकते. सोमनाथ म्हणाले, अद्याप कोणती ठोस तारीख जाहीर केली नाही. सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्या निश्चित तारखेपर्यंत पोहोचू. अंतिम तारीख १२ ते १९ या मर्यादित असेल. ‘चांद्रयान -३’ अंतराळयान पूर्णपणे तयार असून आता ते प्रक्षेपणयानाशी (रॉकेट)जोडले जात आहे आणि कदाचित हे काम आणखी दोन-तीन दिवसात पूर्ण होईल त्यानंतर त्याची विस्तृत चाचणी केली जाईल,असेही सोमनाथ म्हणाले.

हे ही वाचा:

पिकनिकला गेलेल्यांची कार पडली ३० फूट खड्ड्यात; तिघे दगावले!

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला मनसेचा विरोध !

सदाशिव पेठेतील कोयता हल्ल्याप्रकरणी तीन पोलीस कर्मचारी निलंबित

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न, अहमदनगरचे काळे दाम्पत्य मानाचे वारकरी

”चांद्रयान-३ ची  वैशिष्ट्ये

चार वर्षांपूर्वी चंद्राच्या भूमीवर क्रॅश झालेल्या ‘चांद्रयान-२ चे’ हे फॉलो-ऑन मिशन आहे.चांद्रयान-२ मोहिमेच्या तुलनेत अनेक बदल करण्यात आले आहेत. मिशनमध्ये पाचऐवजी चार मोटर्स असतील, तसेच इतरही अनेक बदल करण्यात आले आहेत. इस्रोने मिशनसाठी लँडर आणि रोव्हरचे नाव उघड केले नाही आणि पूर्वीचे लँडर, विक्रम आणि रोव्हर, प्रज्ञान यांची नावे ठेवू शकतात.चांद्रयान-३ मध्ये आणखी एक महत्त्वाची भर म्हणजे हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ (शेप) पेलोडच्या स्पेक्ट्रो-पोलरीमेट्रीचा समावेश. या मोहिमेचे उद्दिष्ट चंद्राच्या दूरच्या बाजूला शोधण्याचे आहे आणि चंद्राच्या पृष्ठभागावर मऊ जमिनीवर जाण्याचा प्रयत्न केला जाईल. चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या वर्णक्रमीय आणि ध्रुवीय मोजमापांवर विस्तृत अभ्यास करण्यासाठी आणि मौल्यवान गोळा करण्यासाठी या अवकाशयानाची रचना केली गेली आहे.

Exit mobile version