32 C
Mumbai
Monday, December 2, 2024
घरविशेषटू स्पेसक्राफ्ट मिशनसाठी युरोपियन स्पेस एजन्सीसोबत इस्रो सज्ज

टू स्पेसक्राफ्ट मिशनसाठी युरोपियन स्पेस एजन्सीसोबत इस्रो सज्ज

PSLV-XL ४ डिसेंबर रोजी युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ESA) प्रोबा-३ मिशनचे प्रक्षेपण करेल

Google News Follow

Related

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो अंतराळात उड्डाण करण्यासाठी आणि सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अशा दोन महत्त्वाकांक्षी दोन अंतराळ यान मोहिमेची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन- XL (PSLV-XL) ४ डिसेंबर २०२४ रोजी, सायंकाळी ४ वाजून ८ मिनिटांनी श्रीहरीकोटा, भारत येथून युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ESA) प्रोबा-३ मिशनचे प्रक्षेपण करेल.

सध्या भारतात असलेल्या युरोपियन एजन्सीने PSLV चे एकत्रीकरण पूर्ण करण्यासाठी पेलोड फेअरिंगमध्ये अंतराळ यानाला यशस्वीरित्या अंतर्भूत केले. एकत्रीकरणानंतर, लॉन्चसाठी रिहर्सल देखील घेण्यात आली. हे मिशन इस्रो आणि ESA यांच्यातील महत्त्वपूर्ण सहकार्याचे दर्शन करते. ज्याचा उद्देश सूर्याचा अभ्यास करणे. सौर वातावरणाचा सर्वात बाह्य स्तर आहे त्याचा अभ्यास करणे जो सौर गतिशीलता आणि अवकाशातील हवामान घटना समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

हे ही वाचा..

योगी सरकारचा मोठा निर्णय; महाकुंभ मेळ्यासाठी स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा

बांगलादेशने इस्कॉनच्या ५० हून अधिक सदस्यांना भारतात येण्याची परवानगी नाकारली

जो बायडन यांचा यू-टर्न; शस्त्र आणि कर फसवणूक प्रकरणात मुलाला केले माफ

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘इंडी’ला दणका देत ‘आप’चा एकला चलोचा नारा

प्रोबा-३ हे जगातील पहिले अचून निर्मिती उड्डाण मोहीम म्हणून ओळखले जाते. ज्यामध्ये दोन उपग्रहांचा समावेश आहे जे कृत्रिम सूर्यग्रहण तयार करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करतील. हे उपग्रह अत्यंत लंबवर्तुळाकार कक्षेत अंदाजे १५० मीटरने वेगळे केले जातील, ज्यामुळे ते सूर्यप्रकाश रोखू शकतील आणि अभूतपूर्व तपशीलात कोरोनाचे निरीक्षण करू शकतील. हे सेटअप सहा तासांपर्यंत सतत निरीक्षण करण्यास सक्षम आहे. एकूण ५५० किलो वजनाचे, दोन उपग्रह – ऑकल्टर आणि कोरोनाग्राफ – कोरोनाच्या तपशीलवार प्रतिमा कॅप्चर करण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. ऑकल्टर सूर्याचा प्रखर प्रकाश रोखेल तर कोरोनाग्राफ या सावलीचा उपयोग सौर घटनांचा अभ्यास करण्यासाठी करेल ज्यांचे निरीक्षण करणे अन्यथा कठीण आहे. हे प्रक्षेपण केवळ विश्वासार्ह प्रक्षेपण भागीदार म्हणून इस्रोच्या क्षमतांचे प्रदर्शन करत नाही तर जागतिक अंतराळ संशोधनात भारताची वाढती भूमिका अधोरेखित करते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
204,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा