25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषइस्रोकडून अति-उंचीवरील वातावरणाच्या अभ्यासासाठी साऊंडिंग रॉकेटचे प्रक्षेपण

इस्रोकडून अति-उंचीवरील वातावरणाच्या अभ्यासासाठी साऊंडिंग रॉकेटचे प्रक्षेपण

Google News Follow

Related

भारतीय अवकाश संशोधन संस्थेेने (इस्रो) वातावरणातील वाऱ्यांचा आणि प्लास्मा डायनामिक्सचा अभ्यास करण्यासाठी आरएच-५६० या रॉकेटचे, आंध्र प्रदेशमधील सतिश धवन अवकाश केंद्र (एसडीएससी) श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण केले.

आरएच-५६० हे दोन टप्प्यांचे घन इंधनावर चालणारे साऊंडिंग रॉकेट या वर्गात येणारे रॉकेट आहे. उच्च स्तरावरील वातावरणाचा आणि अंतराळाचा अभ्यास करण्यासाठी या रॉकेटचा वापर केला जातो.

त्याबरोबरच या रॉकेटचा वापर घनरूप इंधनावर चालणाऱ्या इंजिनांच्या परिक्षणासाठीही केला जातो. ज्यांचा वापर उपग्रह प्रक्षेपणासाठी केला जातो.

हे ही वाचा:

नागपूर बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षणाला सुरूवात

यशवंत सिन्हा झाले तृणमूलवासी

सचिन वाझेंना अडकवणारे अधिकारी कोण?

इस्रोकडे सध्या विविध प्रकारची साऊंडिंग रॉकेट्स आहेत. आरएच-२००, आरएच-३००-एमके-२ आणि आरएच-५६०-एमके-२ ही रॉकेट्स आहेत. ही रॉकेट्स ८ ते १०० किलो वजन वाहून नेण्यास सक्षम असतात आणि या वजनासह ते ८० ते ४७५ किमी उंची गाठू शकतात.

इस्रो १९६५ पासून साऊंडिंग रॉकेट्स बनवत आहे आणि घनरूप इंजिनांच्या तंत्रज्ञानात या रॉकेट्सचा अनुभव अतिशय फायद्याचा ठरला आहे, असे इस्रोच्या वेबसाईटवरून कळते. १९७५ मध्ये सगळे साऊंडिंग रॉकेट प्रकल्प रोहिणी साऊंडिंग रॉकेट (आरएसआर) या नावाखाली एकत्रित करण्यात आले होते.

इस्रोने फेब्रुवारीमध्येच उपग्रह प्रक्षेपणात दमदार कामगिरी केली आहे. यापूर्वी देखील अनेक अवकाश मोहिमा यशस्वी करून दाखवल्या आहेत. लवकरच भारतीय अवकाशवीरांना अंतराळात पाठवण्याचा इस्रोचा प्रयत्न आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा