इस्रोची अवकाशात यशस्वी झेप

ईओएस ०८ उपग्रहाचे प्रक्षेपण, एसएसएलव्हीची विकास प्रक्रिया पूर्ण

इस्रोची अवकाशात यशस्वी झेप

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने आपल्या तिसऱ्या विकासत्मक एसएसएलव्हीचे यशस्वी प्रक्षेपण केले. त्याअंतर्गत ईओएस ०८ हा छोटा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशातील सतीश धवन स्पेस सेंटरमधून हे एसएसएलव्हीचे यशस्वी प्रक्षेपण शुक्रवार १६ ऑगस्ट रोजी करण्यात आले. यामुळे भारताचे एसएसएलव्हीच्या या प्रक्षेपणातून इस्रोच्या छोट्या उपग्रहांच्या प्रक्षेपणाची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या रॉकेटमुळे आता ५०० किलोग्रॅम पर्यंतचे उपग्रह अवकाशात पाठवता येणार आहेत. हे उपग्रह आता पृथ्वीच्या खालील कक्षेत स्थिरावणे शक्य होणार आहे.

इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी यासंदर्भात आपल्या सर्व सहकाऱ्यांचे, शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

सोमनाथ यांनी सांगितले की, छोटे उपग्रह वाहून नेता येतील असे एसएसएलव्ही डी ३/ईओएस ०८ हे यशस्वीरित्या सोडण्यात आले आहे. हे यान सोडण्यात आल्यानंतर ते निर्धारित कक्षेत स्थिरावले आहे. सर्व काही सुरळीत पार पडले आहे. ईओएस ०८ हा उपग्रह आणि एसआर ०८ हा उपग्रहदेखील कक्षेत स्थिरावला आहे. एसएसएलव्ही डी ३ पथकाचे याबद्दल अभिनंदन.

हे ही वाचा:

समान नागरी कायदा, मोदींनी लाल किल्ल्यावरून शड्डू ठोकले…

गंमतच आहे! कोलकात्यातील बलात्कार, हत्या प्रकरणी ममताच काढणार निषेध मोर्चा

अहमदाबाद-मुंबई डबल डेकर एक्स्प्रेसचे दोन डबे झाले वेगळे!

पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेला आरोपी सापडला राजस्थानात

ही यशस्वी झेप घेतल्यानंतर भारतीय उद्योग आता या रॉकेटचा भविष्यातील विविध मोहिमांसाठी उपयोग करू शकतील. इस्रोच्या या यशस्वी प्रयोगानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी इस्रोच्या पथकाचे अभिनंदन केले आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, एसएसएलव्ही डी ३/ईओएस ०८ ची मोहीम यशस्वी ठऱली आहे.

Exit mobile version