इस्रोच्या पुढील मोहिमांबद्दलची माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिली. मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला होता. त्यामुळे इस्रोच्या मोहिमांना स्थगिती मिळणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार २०२३ मध्ये होणारी ‘गगनयान’ मोहिम आणि २०२३च्या मध्यापर्यंत सुर्याच्या अभ्यासासाठी आखलेली ‘आदित्य’ मोहिम इस्त्रोकडून होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
२०२३ च्या मध्यापर्यंत सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य’ नावाचा उपग्रह इस्रोकडून पाठवला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महत्वकांक्षी समानवी ‘गगनयान’ मोहिम २०२३ मध्येच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून करोनाचा या मोहिमेच्या तयारीवर फारसा परिणाम झालेला नाही हेही स्पष्ट करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
नवाब मलिक यांचा बिनशर्त माफीनामा
अनिल परबांवर फौजदारी गुन्हा दाखल करा
५७व्या वर्षी बोरिस जॉन्सन यांच्याकडे हलला सातव्यांदा पाळणा
३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक स्थगितच
भारताच्या संभाव्य अंतराळवीरांचे रशियामधील प्रशिक्षण आणि या मोहिमेची तांत्रिक तयारी सुरु असल्याचे जितेंद्र सिंह यांनी सांगितले. गगनयानची तयारी सिद्ध करणाऱ्या दोन मोहिमा होणार आहेत, त्यापैकी एका मोहिमेत एक मानवी रोबोटही पाठवला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
२०३० पर्यंत भारताचे अवकाश स्थानक कार्यरत झालेले असेल, या दृष्टीने पावले टाकली जात असल्याची माहिती विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जीतेंद्र सिंह यांनी दिली आहे.