भारतीय आंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रोने २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान – ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी उतरवून ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला. या मोहिमअंतर्गत तब्बल १४ दिवस चांद्रयान – ३ हे चंद्रावर संशोधन करत होते. प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर इस्रोला चंद्रावरील वेगवेगळी माहिती, फोटो आणि व्हिडीओ पाठवत होते. परंतु, चंद्रावर रात्र झाल्यानंतर भारताचे हे यान निष्क्रिय झाले होते.
इस्रोने १४ जुलै २०२३ रोजी श्रीहरीकोटा येथून चांद्रयान – ३ चे प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यानंतर चंद्रावर पोहचताच या यानाने काम करण्यास सुरुवात केली होती. या यानातील सर्व उपकरणं ही सौरऊर्जेवर चालतात. चंद्रावर अंधार पडल्यामुळे ही सर्व उपकरणं ४ सप्टेंबर रोजी निष्क्रिय करण्यात आली होती. म्हणजेच, ही सर्व उपकरणं स्लीप मोडमध्ये टाकण्यात आली होती.
चंद्रावर १५ दिवस उजेड आणि १५ दिवस अंधार असतो. त्यामुळे चांद्रयान ३ निष्क्रिय करण्यात आले होते. चंद्रावर आता पुन्हा सकाळ होऊ लागली आहे. त्यामुळे भारतीय आंतराळ संशोधन संस्था चांद्रयान – ३ सक्रीय करण्याचा प्रयत्न करत आहेत.
इस्रोने एक्स अकाऊंटवरून ट्विट करत याबद्दल अधिकची माहिती दिली आहे. इस्रोचे शास्त्रज्ञ मागील १८ दिवसांपासून स्लीप मोडवर असलेल्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला पुन्हा चालविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, या कामात इस्रोला अद्याप यश आलेलं नाही. मात्र, प्रयत्न सुरूच राहणार आहेत, असं इस्रोने म्हटलं आहे.
Chandrayaan-3 Mission:
Efforts have been made to establish communication with the Vikram lander and Pragyan rover to ascertain their wake-up condition.As of now, no signals have been received from them.
Efforts to establish contact will continue.
— ISRO (@isro) September 22, 2023
हे ही वाचा:
नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस; शाळांना सुट्टी
अजित पवारांकडून शरद पवारांच्या आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची मागणी
महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी अदानींना मिळाले १३,८८८ कोटी रुपयांचे कंत्राट !
सनातन धर्मावर टिप्पणी केल्याप्रकरणी उदयनिधी स्टॅलिनला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस !
विक्रम लँडर किंवा प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता खूप कमी आहे. अनेक शास्त्रज्ञांनी याबाबत आधीच वेगवगळे दावे केले आहेत. दरम्यान, भारताचे हे यान सक्रीय झाले तर ही भारतासाठी खूप मोठी उपलब्ध असणार आहे.