लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यात ५५८ ठार, हिजबुल्लाहने प्रत्युत्तरादाखल २०० रॉकेट डागले

आयडीएफनेही लांब पल्ल्याच्या रॉकेटची छायाचित्रे केली प्रसिद्ध

लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यात ५५८ ठार, हिजबुल्लाहने प्रत्युत्तरादाखल २०० रॉकेट डागले

इस्रायलने सोमवारी (२३ सप्टेंबर) लेबनॉनवर हवाई हल्ले केल्यानंतर हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलमध्ये सुमारे २०० रॉकेट डागले आहेत. इस्रायलने केलेल्या कालच्या हवाई हल्ल्यात सुमारे ५५८ लोक ठार झाल्याची माहिती आहे.

हिजबुल्लाहने प्रत्युत्तरादाखल सोमवारी संध्याकाळी उत्तर इस्रायलच्या दिशेने सुमारे २०० रॉकेट सोडले. हैफा, अफुला, नाझरेथ आणि उत्तर इस्रायलमधील इतर शहरांवर रॉकेट डागले गेले. हिजबुल्लाहचा रॉकेट हल्ला रात्रभर सुरु होता. मिळालेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहने यावर म्हटले की, रॉकेट हल्ल्यात इस्रायली लष्करी तळ आणि हवाई क्षेत्रांना लक्ष्य केले.

हल्ल्यावर इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने म्हटले आहे की, बहुतेक रॉकेट आयर्न डोम संरक्षण प्रणालीद्वारे रोखण्यात आले आणि कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झालेले नाही. आयडीएफ चीफ ऑफ स्टाफ, लेफ्टनंट जनरल हर्झी हालेवी यांनी सांगितले की, लेबनॉनमध्ये सैन्य पुढील टप्प्यांची तयारी करत आहे आणि ते नंतर त्याबद्दल तपशीलवार सांगतील. तसेच आयडीएफने लेबनॉनमधील एका घराच्या तळघरात ठेवलेल्या लांब पल्ल्याच्या रॉकेटची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या छायाचित्रा वरून इस्रायलच्या हल्ल्याची पुढील भूमिका स्पष्ट होत आहे.

हे ही वाचा : 

आरोपीला भरचौकात फाशी द्या मागणी करणाऱ्यांची आपुलकी कशी वाढली?

अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदी- झेलेन्स्की भेट; संघर्षाचे निराकरण करण्यावर भर

इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; १८२ ठार, ७०० हून अधिक जखमी!

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा ‘एन्काउंटर’

दरम्यान, इस्रायलने केलेल्या कालच्या हल्ल्यावर लेबनीज आरोग्य मंत्रालयाने म्हटले, महिला-मुलांसह ५५८ लोक मरण पावले आहेत, तर १,६४५ हून अधिक जखमी झाले आहेत. इस्रायलच्या लेबनॉनवरील कालचा हल्ला सर्वात मोठा असल्याचे म्हटले जात आहे.

Exit mobile version