इस्रायलचा येमेनवर बॉम्ब हल्ला, तिघांचा मृत्यू, ८० जखमी !

हल्ल्याचा घेतला बदला

इस्रायलचा येमेनवर बॉम्ब हल्ला, तिघांचा मृत्यू, ८० जखमी !

काही दिवसांपूर्वी येमेनच्या हुथी बंडखोरांनी इस्रायलच्या तेल अवीव शहरातील अमेरिकन दूतावासावर ड्रोनने हल्ला करून दहशत पसरवली होती. हल्ल्यानंतर इस्रायली प्रशासन सायरन वाजवून लोकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि पुढील संदेशांसाठी सतर्क राहण्याचे संकेत देत होते. आता इस्रायलने आपल्या लढाऊ विमानांच्या मदतीने येमेनवर मोठ्या प्रमाणावर हल्ले करून बदला घेतला आहे.

इस्रायलने येमेनच्या अल हुदेदा भागात बॉम्बफेक करून तेल अवीवच्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. इस्रायलने अल होदेदा येथे ड्रोन हल्ला करत येमेनचे बंदर, तेल डेपो आणि पॉवर स्टेशन उद्ध्वस्त केले आहेत. या ड्रोन हल्ल्यात येमेनमधील तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर ८० हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात इस्रायलने आपल्या F-३५ आणि F-१६ लढाऊ विमानांचा वापर केला.

हे ही वाचा..

फेक नरेटिव्हचा रावण, मारू नाभीत बाण, चढू सत्तेचा सोपान!

अफगाणींचा पाकिस्तानी दूतावासावर हल्ला, पाकचा ध्वज उतरवला !

फ्लाईटमध्ये विनयभंग; जिंदाल स्टीलच्या सीईओला गमवावी लागली नोकरी !

एक दिवस मराठेच जरांगेंची गोधडी हिसकावून घेतील…

इस्रायलने अल-हुदेदा भागातील तेल डेपो आणि पॉवर स्टेशनला लक्ष्य केल्याने त्यानंतर आसपासच्या भागातील पेट्रोल पंप बंद करण्यात आले. यासोबतच अल हुदेदा बंदरालाही लक्ष्य करण्यात आले. इस्रायलने हिजबुल्लापाठोपाठ आता हुथी बंडखोरांना लक्ष्य केले आहे, त्यामुळे इस्रायलविरुद्ध आणखी एक युद्धाची आघाडी निर्माण होण्याची भीती आहे. दरम्यान, हुथी बंडखोरांनी अमेरिकन दूतावासावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात एक इस्रायली नागरिक मरण पावला होता तर १० जखमी झाले होते.

Exit mobile version