23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषगाझात आकाशातून पत्रके पडली, ११ लाख पॅलेस्टिनींना विस्थापित होण्याच्या सूचना

गाझात आकाशातून पत्रके पडली, ११ लाख पॅलेस्टिनींना विस्थापित होण्याच्या सूचना

गाझात लपून बसलेल्या हमास अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी इस्रायलचे पाऊल

Google News Follow

Related

इस्रायलच्या लष्कराने पॅलेस्टाइनच्या ११ लाख लोकांना तात्काळ विस्थापित होण्याचा इशारा दिला आहे. उत्तर गाझा पट्टीतून बाहेर पडून त्यांनी दक्षिण भागात विस्थापित व्हावे असे इस्रायलच्या लष्काराने म्हटले आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी हा भाग आपल्या ताब्यात घेतला असून त्यांना हुसकावून लावण्यासाठी इस्रायलने हे पाऊल उचलले आहे.

 

 

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आतापर्यंत ३ हजार लोक मृत्युमुखी पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही परिस्थिती येत्या काळात आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. हमासने आठवड्याभरापूर्वी इस्रायलवर ५ हजार रॉकेट्स डागली होती तसेच त्यांच्या अनेक लोकांना बंदी बनविण्यात आले होते. अनेक तान्ह्या मुलांची हत्या हमासच्या दहशतवाद्यांनी केल्याचे फोटोही समोर आले होते. त्यांच्या या दहशतवादी कृत्याला उत्तर देण्यासाठी इस्रायलने गाझा पट्टीत जोरदार बॉम्बवर्षाव केला असून अनेक इमारती भुईसपाट झाल्या आहेत.

 

हे ही वाचा:

ऑपरेशन अजयमुळे इस्रायलमधून २१२ भारतीय मायदेशी परतले

भारत- पाक सामना बघायला जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष ट्रेन

सियाचीनमध्ये उभा राहिला पहिला मोबाईल टॉवर

ऑनलाइन गेमिंग ऍप प्रकरणातील आरोपी मुंबईजवळ बांधणार होता पंचतारांकित हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स

इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (आयडीएफ) म्हटले आहे की, तुम्हाला मानवी ढाल बनविणाऱ्या हमासच्या दहशतवाद्यांपासून तुम्ही दूर राहा. त्यासाठी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांना घेऊन विस्थापित व्हा.गेल्या काही दिवसांत इस्रायलच्या सरकारने गाझा पट्टीत जोरदार आक्रमणे केली असून सर्वसामान्यांना त्याचा त्रास होणार नाही, याचीही काळजी घेण्यात येत आहे. शुक्रवारी आयडीएफने विमानांमधून गाझापट्टीत काही पत्रके टाकली आणि त्यातून गाझाच्या दक्षिण भागात जाण्याची सूचना करण्यात आली. आकाशातून अशी पत्रके पडत असल्याचे व्हीडिओ समोर आले आहेत. त्या पत्रकात म्हटले आहे की, तुमच्या सुरक्षेसाठी तुम्ही आपापल्या घराकडे पुढील सूचना मिळेपर्यंत परत येऊ नका. उत्तर गाझातील लोकांनी त्यामुळे येत्या २४ तासात घरे सोडून दक्षिण गाझात स्थलांतरित व्हायचे आहे.

 

 

संयुक्त राष्ट्रांनी यावर टीका केली असून सर्वसामान्य नागरिकांना २४ तासात आपली घरे सोडून अन्यत्र जाणे शक्य नाही. त्यांच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे की, असे आदेश देण्यात आले असतील तर आधीच अडचणीत सापडलेल्या लोकांच्या संकटात भर पडेल. इस्रायलचे प्रवक्ते डॅनिएल हॅगारी यांनी म्हटले आहे की, यावरून हमासचे लोक पॅलेस्टिनी नागरिकांना ढाल बनवून स्वतःचे रक्षण करत असल्याचे दिसते. सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेची त्यांना अजिबात चिंता नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा