28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषइस्रायल-पॅलेस्टाईन मधील संघर्ष हा जुनाच!

इस्रायल-पॅलेस्टाईन मधील संघर्ष हा जुनाच!

२०व्या शतकात याची सुरुवात

Google News Follow

Related

आधुनिक काळात सर्वात हिंसक म्हणून सांगितला जाणारा इस्रायल-पॅलेस्टाईन मधील संघर्ष हा हजारो वर्षे जुना आहे. याची सुरुवात २०व्या शतकात सुरू झाली. इस्रायल-पॅलेस्टाईन विवादित क्षेत्र हे ख्रिश्चन धर्माचे जन्मस्थान असल्याचे म्हटले जाते,येथे हजारो वर्षे जुनी ज्यूंची अनेक पवित्र स्थळे आहेत तसेच येथे इस्लामिक धार्मिक महत्त्वाची अनेक ठिकाणे देखील आहेत.

इस्रायल म्हणून ओळखल्या जाणार्‍या लेव्हंट (पश्चिम आशिया आणि पूर्व भूमध्य प्रदेश) मध्ये १० हजार ते ४.५ हजार इसवी सन पूर्व दरम्यान मानवी वसाहतींचे पुरावे सापडतात.कांस्य आणि लोहयुगात इजिप्तच्या अंतर्गत या भागात केनाइट राज्ये निर्माण झाली. ज्यू समुदायाचा उगम या कैनाइट लोकांच्या एका शाखेतून झाला असे मानले जाते, जे एकेश्वरवादी होते.तसेच ज्यूंच्या वंशजांनी ९०० वर्षांपूर्वी येथे एक राज्य स्थापन केले, त्याला ज्यूंचे युनायटेड किंगडम असेही म्हणतात.

लोहयुगात पॅलेस्टाईन नावाचा समाज देखील या क्षेत्रात राहत असल्याचे काही पुरातत्त्व सांगतात.यांची निर्मिती ग्रीक लोकांपासून झाल्याचे मानले जाते.यांचा अनेक देवांवर श्रद्धा आणि विश्वास होता.त्यामुळे दोन्ही समुदायामध्ये संघर्ष होत असत.पॅलेस्टाईन राज्याला इजिप्शियन साम्राज्याने नष्ट केले, जे काही लोक यामध्ये वाचले गेले ते लोक स्थानिक समुदायांमध्ये सामील झाले.त्याच वेळी, निओ-असिरियन आणि निओ-बॅबिलोनियन साम्राज्यांच्या हल्ल्यांमुळे, ज्यूंना अनेक वेळा पळून जावे लागले.

वादाची सुरुवात
१९१७ मध्ये ब्रिटिश अधिकारी आर्थर बालफोर म्हणाले की, ब्रिटनच्या पराभवातून ऑट्टोमन साम्राज्याकडून ताब्यात घेतलेल्या प्रदेशात ज्यूंसाठी एक राष्ट्र निर्माण करेल.अरब वंशाचे नागरिक या भागाला पॅलेस्टाईन मानत असत, यामध्ये ज्यु समाजाने आपली हजारो वर्षांची संस्कृती पुनरुज्जीवित करण्याची संधी पहिली.यामुळे पॅलेस्टिनी राष्ट्रवादाला चालना मिळाली.त्यानंतर दंगली आणि हिंसाचाराच्या नव्या संघर्षांला सुरुवात झाली.युरोपमध्ये नाझींनी ज्यूंची हत्या केली; जे वाचले ते इस्रायलमध्ये जावू लागले.अरब नागरिकांनी याला विरोध दर्शविला परंतु अरब राज्याची ताकद कमकुवत झाल्याने ते रोखू शकले नाहीत.

हे ही वाचा:

भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनचे पहिले सुवर्ण

हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्याला इस्रायलकडून एअर स्ट्राईकने उत्तर

‘विक्रम आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रिय होणार नाहीत’

हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलमध्ये ‘स्टेट ऑफ वॉर’ घोषित

यूएन ठराव आणि इस्रायलची स्थापना
संयुक्त राष्ट्र महासभेने २९ नोव्हेंबर १९४७ रोजी पॅलेस्टाईनचे अरब राष्ट्र, ज्यू राज्य आणि जेरुसलेम शहर असे विभाजन करण्याचा ठराव संमत केला.परिणामी अरब आणि ज्युमध्ये हिंसाची नवी सुरुवात झाली.यामध्ये अरब कमजोर झाला होता.त्यानंतर ज्यूंनी १४ मे १९४८ रोजी इस्रायल राज्य घोषित केले.त्याच वर्षी अरब आणि इस्रायल मध्ये युद्ध झाले या युद्धात १५ हजार लोक मारले गेले.१९५६ रोजी अरब आणि इस्रायलमध्ये दुसरे युद्ध झाले, यामध्ये इस्रायलने गाझा पट्टीवर पूर्णपणे ताबा मिळवला आणि पॅलेस्टिनी सरकारला हद्दपार केले.मात्र, नंतर त्यांनी हा ताबा सोडला आणि पॅलेस्टाईन सरकार पुन्हा स्थापन केले.

शांततेचे प्रयत्न अयशस्वी
१९९३ मध्ये ओस्लो शांतता करार, २००० मध्ये कॅम्प डेव्हिड करार, २००१ मध्ये ताबा शिखर परिषद, २००७ मध्ये अरब पीस इनिशिएटिव्ह इत्यादीद्वारे संघर्ष थांबवण्याचे प्रयत्न झाले, परंतु ते अयशस्वी झाले.यामध्ये मुख्य कारण म्हणजे इस्रायली लष्कर आणि नागरिकांवर हल्ले करणाऱ्या हमाससारख्या दहशतवादी संघटना होत्या. १८८१ मध्ये ज्यू जेरुसलेममध्ये आणि त्याच्या जवळपास पोहचू लागले.पहिल्या महायुद्धाने ज्यूंसाठी आदर्श परिस्थिती आणली, त्यानंतर १९१७-१८ मध्ये ब्रिटिश सरकारने ज्यूंच्या स्वप्नांना पाठिंबा दिला.ब्रिटनने डिसेंबर १९१७ मध्ये जेरुसलेमवर ताबा मिळवला आणि ऑट्टोमन साम्राज्याचे क्षेत्रावरील नियंत्रण संपवले.

६ दिवस युद्ध आणि त्यानंतर
इस्रायलने तिसरे अरब-इस्रायल युद्ध एकतर्फी जिंकले.५ जून ते १० जून १९६७ या ६ दिवसीय युद्धानंतर इस्रायल एक ताकतवर देश बनला होता.इस्रायलने प्रथम हल्ला करून शेजारील देशांची हवाई शक्ती जवळजवळ पूर्णपणे नष्ट केली होती. त्याने इजिप्त, जॉर्डन आणि सीरियातून बरीच जमीन हस्तगत केली आणि शांतता करारही करावा लागला.झालेल्या युद्धात २० हजार अरब आणि सुमारे १ हजार इस्रायली मारले गेले.वादग्रस्त वेस्ट बँक आणि गाझामध्ये २०१३ दरम्यान १२ दशलक्ष लोक राहत होते, त्यापैकी दोन्ही समुदायांची लोकसंख्या जवळपास निम्मी आहे.ही लोकसंख्येला ज्यू आणि अरब भागात विभागली गेली आहे, परंतु हिंसाचार आणि दंगली सुरूच आहेत.

इतिहास
इ.स.पू. ५३९ मध्ये पर्शियन साम्राज्याचा शासक सायरस द ग्रेट याने ज्युसमाजाला त्यांच्या राज्यात परत जाण्याची आणि तेथे स्वतःचे राज्य निर्माण करण्यासह स्वतःची मंदिरे उभारण्याची परवानगी दिली.पुढील ६०० वर्षे त्याच्यासाठी अनुकूल होते.मात्र, त्यानंतर अलेक्झांडर, रोमन आणि बायझँटाईन यांच्या साम्राज्याने ज्यूंची जेरुसलेम शहरावर आणि त्यांची मंदिरे नष्ट करत ज्यूंवर विजय मिळवला. ५व्या शतकापर्यंत या प्रदेशात ख्रिश्चन धर्मीय लोकांची संख्या वाढली, या कालावधीत बहुतेक ज्युसमाजातील लोकांनी पलायन करून स्थलांतरित झाले.त्यानंतर सातव्या शतकात पुढील ६०० वर्षांसाठी इस्लामिक खलिफाची सत्ता आली. ११व्या शतकात, मुस्लिम आणि ख्रिश्चनांमध्ये धार्मिक युद्ध सुरू झाले. पवित्र जेरुसलेमला इस्लामिक राजवटीपासून मुक्त करणे हे या युद्धाचे मुख्य कारण होते.१५१६ मध्ये ऑट्टोमन साम्राज्याने हे क्षेत्र ताब्यात घेतले होते.परंतु पर्शियन काळातील झालेल्या त्या युद्धात ज्यूंची संख्या १० लाखांच्या तुलनेत लोकसंख्या ३ लाखांवर आली होती,परंतु ज्यूंची उपस्थिती कायम राहिली.

 

 

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा